🔥 TRENDING মুনিনগরে বিজেপির উলিয়াড়া অঞ্চল কমিটি... રાજકોટ માલધારી ફાટક પાસે TRB ટ્રાફિક બ... रायगड जिल्ह्यात बिरवाडी भादेकोंड येथे... Russia-Ukraine War: Ongoing Conflict C... Kanak News Odisha Issues Latest Weathe... Andhra CM Signs Deal with PanIIT to Ra...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

धानोरा टाकीची स्वच्छता करून स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत; नगरसेवक प्रमोद शिंदे यांची पहाटे पाहणी

✍️ Reporter: गणेश दादाराव शिंदे 🗓 05 Oct 2026, 11:26 AM 👁 23
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नगरसेवक प्रमोद शिंदे यांची पहाटे पाहणी

बीड:गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने पाईपलाईनमधून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. या समस्येची दखल घेत नगरसेवक प्रमोद शिंदे यांनी आज पहाटेच धानोरा रोडच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
​नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी धानोरा टाकी वॉश आऊट करून घेत पाणीपुरवठा सुरळीत सुरू करून दिला. लवकरच टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागातील नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती नगरसेवक शिंदे यांनी दिली आहे. नगरसेवकाने पहाटेच घेतलेल्या या पुढाकारामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
📲Get App