🔥 ट्रेंडिंग ઝાલોદમાં દિવાળી તહેવારો માટે પોલીસ ફૂટ... पटना सिटी क्षेत के तमाम छठ घाटों के नि... चुनाव पर्यवेक्षक प्रह्लाद सहाय नागा ने... बलिया: जमीन विवाद में घायल बुजुर्ग की... મુઝફ્ફરનગરની આંતરરાષ્ટ્રીય કબડ્ડી ખેલા... बालोतरा के जेरला में अज्ञात बुजुर्ग का...
05 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धडगावच्या अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक घटना; दहावीतील विद्यार्थिनीने संपवले जीवन....!!!

धडगावच्या अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक घटना; दहावीतील विद्यार्थिनीने संपवले जीवन....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 17 सित. 2026, 06:32 PM 👁 79
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धडगाव तालुक्यातील अक्राणी येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना धडगाव तालुक्यातील अक्राणी येथे घडली. येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यावाडी, जि. धुळे संचलित अनुदानित आश्रमशाळेत ही विद्यार्थिनी शिकत होती. मयत विद्यार्थिनीचे वय १५ वर्षे असून ती इयत्ता दहावीच्या वर्गात होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या विद्यार्थिनीने विषारी औषधाचे सेवन केले होते. तिला तात्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. पालकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

दरम्यान, या विद्यार्थिनीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
📲Get App