Lifestyle
दिवाळी भाऊबीजेनिमित्त मौजे नानकासवाडी येथे आदिवासी भगिनींना साडीचोळी व फराळाचे वाटप; सुभाष गोटीराम पवार यांचा स्तुत्य उपक्रम.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १४/११/२०२६ दिवाळी विशेष वृत्त
मुरबाड (प्रतिनिधी):
दिवाळी आणि भाऊबीजेच्या पावन पर्वावर समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उदात्त हेतूने ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्री. सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे नानकासवाडी येथे आदिवासी भगिनींना साडीभेट व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत सुभाष गोटीराम पवार यांनी आदिवासी बांधव आणि भगिनींसोबत दिवाळीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी, "सणांचा खरा आनंद हा केवळ स्वतःपुरता मर्यादित नसून, तो आपल्या माणसांसोबत वाटण्यातच असतो," अशी भावना व्यक्त करत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. सौरभ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. दिपाताई भला, श्री. भाऊराव पवार, श्री. नानू पवार, श्री. शिवाजी पवार, श्री. योगेश पवार, श्री. सतीश पवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि आदिवासी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे आदिवासी पाड्यावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.