🔥 TRENDING Vaibhav Sooryavanshi Hits Record-Break... Vaibhav Sooryavanshi Storm Fuels India... Durgesh Singh: A Legacy of Action and... Filmibeat Releases Synopsis of Hindi F... Koffee With Karan 9: Akshay Kumar and... British India Announces Tour of 'Last...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळी जाहीर करा; आमदार किसन कथोरे यांची शासनाकडे आग्रही मागणी

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 26 Nov 2026, 05:42 AM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह,
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक २६/११/२०२६
दुष्काळ विशेष वार्ता पत्र :.
मुरबाड (प्रतिनिधी) – नीड २४ न्यूज:
यावर्षी मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे आणि सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ हे पाच तालुके तात्काळ 'दुष्काळी तालुके' म्हणून घोषित करण्यात यावेत, अशी आग्रही आणि ठोस मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना दिले निवेदन
आमदार किसन कथोरे यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना अधिकृत पत्र पाठवून ही मागणी केली आहे. या पाचही तालुक्यांतील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत अडकला आहे.
१९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सद्यस्थितीतील पाणीटंचाई आणि पीक नुकसानीची तीव्रता ही ऐतिहासिक १९७२ च्या दुष्काळापेक्षाही अधिक भयानक आहे. या भागातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात तीव्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने या मागणीचा सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आमदार कथोरे यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून या पाचही तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि बळीराजाला योग्य तो आर्थिक दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका आमदार किसन कथोरे यांनी मांडली आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष आता राज्य शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.
📲Get App