🔥 TRENDING पटना स्नातक से एन डी प्रत्याशी के जीत... ગિરનારની લીલી પરિક્રમા ‘પ્લાસ્ટિક મુક્... लखनऊ में डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्री... Jan Sevak Mahakumbh Commences Across M... JAC Gives Meghalaya Government Oct 26... Meghalaya CM Conrad Sangma Announces ₹...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांची कोरावळे गावाला सदिच्छा भेट; स्थानिक सुविधांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 17 Oct 2026, 07:14 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
विशेष वार्तापत्र
दिनांक: १८ ऑक्टोबर २०२६
मुरबाड ठाणे :
ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांची कोरावळे गावाला सदिच्छा भेट; स्थानिक सुविधांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद!
मुरबाड: ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुभाष दादा पवार यांनी नुकतीच मौजे कोरावळे गावाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद शाळा आणि इतर मूलभूत सुविधांची पाहणी करून ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.
कोरावळे गावात आगमन झाल्यानंतर सुभाष दादा पवार यांनी गावातील अंतर्गत रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील अत्यावश्यक व प्रलंबित सुविधांबाबत त्यांनी स्थानिक सहकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यानंतर त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि शाळेला आवश्यक असणाऱ्या इतर सुविधांबाबत त्यांनी उपस्थित शिक्षक व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी सेवा सोसायटीचे संचालक श्री. पांडुरंग धुमाळ, शिवळे गावचे माजी सरपंच श्री. महेश बांगर, कोरावळे गावचे उपसरपंच श्री. नामदेव धुमाळ, श्री. शंकर धुमाळ, श्री. मारुती धुमाळ, श्री. अनिल गोल्हे, श्री. रघुनाथ धुमाळ, श्री. सावळाराम धुमाळ, पोलीस पाटील श्री. दशरश धुमाळ, श्री. हरी धुमाळ, श्री. पुंडलिक धुमाळ, श्री. सुनील गोल्हे, श्री. वैभव ईसामे, श्री. अनिल धुमाळ, श्री. प्रकाश माळी, श्री. अरुण धुमाळ, श्री. रमेश धुमाळ, श्री. सोमनाथ धुमाळ यांच्यासह गावातील बहुसंख्य युवा वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App