🔥 TRENDING వరంగల్: ఇది అడవా.. ఆసుపత్రా? వరంగల్ ఎ... Jammu and Kashmir Police Arrest Drug P... ଗତକାଲି ବହୁ ଚର୍ଚ୍ଚିତ ପରକୀୟା ପ୍ରୀତି ଓ ଜମ... वाराणसी में विदेशी पर्यटक का बैग मिला,... સંતરામપુરમાં 13 કિમી ડામર રોડનું ખાતમુ... Karnataka Stun Railways, Clinch Maiden...
21 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

दुःखद घटनांमुळे शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख मधुकर (आप्पा) घुडे यांचा वाढदिवस सोहळा रद्द.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 21 Nov 2026, 03:34 PM 👁 38
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
. जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
वाढदिवसविशेष वृत्त
नीड २४ न्यूज महाराष्ट्र | प्रतिनिधी (सरळगांव, ता. मुरबाड, जि. ठाणे)
दिनांक: २१ नोव्हेंबर २०२६
भादाणे / सरळगांव (ता. मुरबाड, जि. ठाणे): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख व पी. एन. घुडे विद्यालय, भादाणे या विद्यालयाचे संस्थापकीय अध्यक्ष मा. श्री. मधुकर (आप्पा) घुडे साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी २३ नोव्हेंबर रोजी पी. एन. घुडे विद्यालय, भादाणे येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मात्र, कुटुंबातील व विद्यालयातील दुःखद निधनाच्या घटनांमुळे यंदा विद्यालयात होणारा वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी पी. एन. घुडे विद्यालयातील शिक्षक कै. नारायण शिवराम बाबरे आणि आप्पासाहेबांचे चुलत भाऊ कै. अशोक पांडुरंग घुडे यांचे अकस्मात निधन झाले होते. या दुःखातून सावरत असतानाच, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आप्पासाहेबांचे चुलते कै. बबन मालू घुडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
या सर्व दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि माननीय आप्पासाहेब घुडे यांच्या सूचनेनुसार, यंदा २३ नोव्हेंबर रोजी पी. एन. घुडे विद्यालय, भादाणे येथे होणारा वाढदिवस कार्यक्रम रद्द करण्यात आला असून तो साजरा केला जाणार नाही. तरी मुरबाड तालुक्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व हितचिंतक, शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व शिवसैनिक, कार्यकर्ते, शिक्षक वृंद व नागरिकांनी याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App