🔥 ट्रेंडिंग মানবাজার গড় পাথরমহড়া রাজবাড়ী'র প্রাচীন... उन्नाव के पुरवा सर्किल में सीओ अरविंद... ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಮೊ... Union Cabinet Approves ₹2,014 Crore Ai... સુરેન્દ્રનગર, એલસીબીએ ધાંગધ્રાનાજેગડવા... निकिता डूडी कांग्रेस से जिला प्रमुख बन...
25 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

द रिअल पँथर ऑफ इंडिया: छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान गौरव दिन सोहळा

✍️ रिपोर्टर: G. P. G. U. .7798377959 🗓 25 नव. 2026, 09:51 PM 👁 32
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उद्या 26 नोव्हेंबर 2026 रोजी क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथे संविधान प्रती व शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

उद्या 26 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1:00 वाजता क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथे 'द रिअल पँथर ऑफ इंडिया' संघटनेने संविधान गौरव दिनानिमित्त संविधान प्रती व शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या पवित्र संविधानाचा गौरव करणे व भावी पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षम करणे आहे.

या सोहळ्यात संघटनेचे प्रमुख व प्रदेशाध्यक्ष मा. दिनेश गवळे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील, तर प्रदेश महासचिव मा. आरशाद लखपती हे मुख्य निमंत्रक असतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख मा. रणजीत मनोरे आणि स्वागत अध्यक्ष म्हणून द रिअल पँथर असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाप्रमुख मा. रवि मोरे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

मराठवाडा अध्यक्ष मा. सुनील खरात, राज्य संघटक मा. जयनाथ बोर्डे, सामाजिक न्याय विभागाचे राज्य महासचिव मा. सुरेश दाभाडे, असंघटित कामगार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मा. संतोष उणवणे, युवा मराठवाडा अध्यक्ष मा. जहीर शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मा. मानसीताई म्हस्के, असंघटित कामगार संघटनेचे जिल्हा सचिव मा. पांडुरंग सोनटक्के, जिल्हा सरचिटणीस मा. अमित मोरे, शहर उपाध्यक्ष मा. अनिस गंगापुरकर, शहर सचिव मा. कपिल गिरी व पूर्व शहर अध्यक्ष मा. गणेश गौरय्ये यांसह इतर अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या गौरवशाली सामाजिक उपक्रमास शहरातील नागरिकांनी सहपरिवार व मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे 'द रिअल पँथर ऑफ इंडिया'च्या छत्रपती संभाजीनगर युनिटच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.
📲Get App