🔥 ट्रेंडिंग लाखिसराई में NEET रिटेस्ट धोखाधड़ी में... आम आदमी पार्टी राजस्थान कूदी मैदान में... जालंधर के नागरिकों ने 500 करोड़ के सड़... किशोर कुमार की पुण्यतिथि पर खंडवा में... सिवनी में वॉशिंग मशीन के अंदर मिला 7 फ... केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत ने...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

टायगर पॉईंट ला जाणारया रोडवर अपघात थार गाडी दरीत कोसळली

✍️ रिपोर्टर: सतिश हजारे 🗓 13 अक्टू. 2026, 05:44 PM 👁 23
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

टायगर पॉईंट ला जाणारया रोडवर एका वळणावर ताबा सुटल्याने थार गाडी बॅरिकेट तोडून २० ते २५ फूट खोल दरीत कोसळली

🚨टायगर पॉईंट ला जाणारया रोडवर थारचा थरारक अपघात!

बॅरिकेड तोडून थार २० ते २५ फूट दरीत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली!

📍 लोणावळा | १२ ऑक्टोबर २०२६

लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या काळ्या रंगाच्या थारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयएनएस शिवाजी परिसरातील पहिल्या चढावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थारने रस्त्यालगतचे बॅरिकेड तोडले आणि तब्बल २० ते २५ फूट खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, थार क्रमांक TG 24 A 2552 लायन्स पॉईंटच्या दिशेने जात असताना चढावर वाहन पुढे नेण्यास अडचण निर्माण झाली. चालकाने वाहन रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने काही क्षणांतच थार बॅरिकेड तोडून थेट दरीत कोसळली.

💥 अपघाताची तीव्रता पाहता मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, दरीत कोसळलेली थार बाहेर काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिक आणि पर्यटकांची गर्दी झाली.

⚠️ घाटरस्ते, तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणांसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात वाहन चालवताना पर्यटकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

🚗 वेगापेक्षा सुरक्षितता महत्त्वाची!
एका क्षणाची चूक मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य द्या.

📢 या अपघाताबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतर पुढील अपडेट देण्यात येईल.
📲Get App