🔥 ट्रेंडिंग बीकानेर के स्वास्थ्य केंद्र में डॉक्टर... एक मुसलिम शिक्षका ने यूपी बिहार के महा... दीपावली पर निखिल सेन का संदेश – अपने न... લીલીયા પોલીસે 60 બોરી ચોખા અને 5.70 લા... ਹੁਸ਼ਿਆਰਪੁਰ: ਝੂਠੇ ਪਰਚੇ ਵਿਰੁੱਧ ਹਰਿਆਣਾ ਥਾ... स्वर्गीय जानकी देवी जी का 101 वर्ष में...
08 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

तृप्ती फिल्म प्रोडक्शनची ‘राया मला पळून न्या की राव’ लावणी युट्युबवर प्रदर्शित; रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा! तृप्ती फिल्म प्रोडक्शनतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 08 नव. 2026, 10:33 AM 👁 34
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘राया मला पळून न्या की राव’ ही बहारदार मराठी लावणी

तृप्ती फिल्म प्रोडक्शनची ‘राया मला पळून न्या की राव’ लावणी युट्युबवर प्रjदर्शित; रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा! तृप्ती फिल्म प्रोडक्शनतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे : 8 नोव्हेंबर 2026 मराठी लावणीप्रेमी रसिकांसाठी आनंदाची बातमी असून, तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘राया मला पळून न्या की राव’ ही बहारदार मराठी लावणी नुकतीच युट्युबवर प्रदर्शित झाली आहे. पारंपरिक लावणीचा ठसका, आकर्षक नृत्याविष्कार आणि सुरेल संगीत यांचा सुंदर संगम या लावणीत पाहायला मिळत आहे.

या लावणीचे लेखन व निर्मिती रामदास राऊत यांनी केली असून, पार्श्वगायन राखी चौरे यांनी केले आहे. या लावणीला संगीतबद्ध करण्याचे काम गणेश अस्वार सर यांनी केले आहे. लावणीचे रेकॉर्डिंग भक्ती स्टुडिओ, बेल्हे येथे करण्यात आले असून, कंपोजिशन व रेकॉर्डिंगची जबाबदारी अविष्कार विश्वासराव यांनी सांभाळली आहे.

या लावणीचे दमदार नृत्यसादरीकरण बिजली शुभांजली थोरात यांनी केले असून, त्यांच्या आकर्षक नृत्याविष्कारामुळे लावणीला विशेष रंगत आली आहे. त्यांना कोरससाठी अलकाताई महाजन, ज्योती देशमुख आणि आरती जगताप यांनी साथ दिली आहे.

तसेच हार्मोनियमवर राजेंद्र ताम्हणे सर, तर ढोलकीवर किसन साळवे आमदाबादकर आणि अमोलजी गायकवाड यांनी उत्कृष्ट साथसंगत केली आहे. या सर्व कलाकार, संगीतकार आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीतून ‘राया मला पळून न्या की राव’ ही लावणी उत्तम प्रकारे साकारली आहे.

या लावणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला लोकयुवा वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी तसेच NEED 24 News चे न्यूज रिपोर्टर श्री. अनिल मल्लाव यांची विशेष उपस्थिती लाभली. मराठी लोककला, लावणी आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा कलाकृती महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

तृप्ती फिल्म प्रोडक्शनतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षक, कलाकार, संगीतप्रेमी आणि नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि यशाची नवी पहाट उजाडो, तसेच दीपावलीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची उधळण करो, अशा सदिच्छा निर्माते रामदास राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

लावणीला प्रतिसाद देण्याचे आवाहन!

ही लावणी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या अधिकृत युट्युब चॅनलवर रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या लावणीचा आनंद घ्यावा, व्हिडिओला लाईक व शेअर करावे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन निर्माते रामदास राऊत यांनी केले आहे.

मराठी लोककला आणि लावणीची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने साकारलेली ही कलाकृती रसिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कलाविश्वात अशाच दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करून मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

तृप्ती फिल्म प्रोडक्शन – मराठी कला, संस्कृती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम!
📲Get App