🔥 ट्रेंडिंग घायल गौ माता का कराया उपचार, गौसेवा के... નવસારી જિલ્લા ભાજપના મહામંત્રી ડૉ. લોચ... प्रधानमंत्री पद के लिए नरेंद्र मोदी को... वाराणसी में पुलिस ने 10 किलोग्राम प्रत... नूंह में पुलिस मुठभेड़ में शाहिद की मौ... उज्जैन में रावण दहन पर विवाद: स्थानीय...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
तालुक्यात नुकताच शासकीय सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा भव्य कार्यक्रम
सरकारी योजना

तालुक्यात नुकताच शासकीय सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा भव्य कार्यक्रम

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 15 अक्टू. 2026, 09:58 PM 👁 16
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक १६/१०/३०३६.विशेष वृत्त
ठाणे मुरबाड:० तालुक्यात नुकताच शासकीय सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत परिसरातील शेकडो नागरिकांना विविध महत्त्वाच्या शासकीय सेवा आणि दाखल्यांचे थेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी थेट नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास तहसीलदार श्री. अभिजितजी देशमुख, पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर आणि नगराध्यक्ष श्री. मोहन गडगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यांच्यासोबतच परिसरातील नामवंत व्यक्तिमत्त्वे आणि पदाधिकारी श्री. उल्लासभाऊ बांगर, श्री. रामभाऊ दकवी, श्री. राठोड साहेब, श्री. अनिल देसले, श्री. किसनजी गिरा, श्री. दीपक पवार, श्री. जितेंद्र भावार्थ, श्री. प्रकाश पवार, श्री. अनिल घरत, श्री. सुरेश बांगर सर, श्री. मोहन भावार्थ, श्री. मोहन सासे, श्री. संतोष पवार, श्री. काळुराम घोलप आणि श्री. लक्ष्मण घागस हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानता वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
📲Get App