🔥 TRENDING नगर पालिका सिकंदरा राऊ ने आरो जल प्लां... Nani Announces New Project, Fans Await... Nani Clarifies Delay Rumors: Chiranjee... Manipur Police Arrest Two PLA Militant... Manipur Police Seize Over 8,300 Bottle... Three arrested in Manipur for extortio...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेतातच उगवला नशेचा विळखा...! चिरडे शिवारातून २९.७२ लाखांचा गांजा जप्त, एकावर NDPS नुसार गुन्हा....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 07 Oct 2026, 11:58 AM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील चिरडे गावच्या शिवारात पिकाच्या आड बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (हर्सावद) पोलिसांनी धडक कारवाई करत शेतातून तब्बल ५९ किलो ४४० ग्रॅम वजनाची गांजाची हिरवी झाडे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे बाजारभावानुसार किंमत २९ लाख ७२ हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरडे येथील शेतकरी तुळशीराम बिज्या ठाकरे (रा. चिरडे, ता. शहादा) याने आपल्या शेतजमिनीत बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना सुरू ठेवली होती. याबाबत गोपनीय माहिती मिळताच हर्सावद पोलीस पथकाने शेतात छापा टाकला. यावेळी शेतात लावलेली गांजाची झाडे ताब्यात घेऊन पंचनाम्यानंतर जप्त करण्यात आली.

या प्रकरणी आरोपी तुळशीराम ठाकरे याच्या विरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी घटनास्थळावरून मातीचे नमुने घेऊन ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हर्सावद पोलीस पथकाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवैध गांजा लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
📲Get App