🔥 TRENDING Chhattisgarh High Court Upholds Divorc... Raipur Employment Fair Selections: 5,0... Jadeja Selected for Saurashtra Squad A... Punjab Government Regularizes Gaurav Y... Punjab Sets Fixed Paddy Procurement Ta... Punjab National Bank and Firstsource S...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

शेतकऱ्यांचे राज्य सरकारला २५ ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम;

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 09 Oct 2026, 01:38 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चाचा इशारा

शेतकऱ्यांचे राज्य सरकारला २५ ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम;

पुणे जिल्हा रिपोर्टर : 09 ऑक्टोंबर 2026

मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चाचा इशारा

प्रमुख मागण्या:
उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर: साखरेच्या बाजारभावाऐवजी खते, मजुरी आणि वाहतूक खर्चाचा विचार करून ऊसदर निश्चित करावा.
गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा: ऊस पूर्ण परिपक्व झाल्यानंतरच गाळप सुरू व्हावे, जेणेकरून साखर कमी मिळणार नाही.

दुसरा हप्ता ५२५ रुपये: मागील हंगामासाठी किमान ५२५ रुपये प्रति टन दुसरा हप्ता तत्काळ दिला जावा.
अंतर अट व इतर: कारखान्यांमधील २५ किलोमीटरची अंतर अट रद्द करावी आणि साखरेची किमान विक्री किंमत ५५ रुपये प्रति किलो करावी.

शेतकरी संघटनांच्या या मागण्यांवर २५ ऑक्टोबरपर्यंत कोणताही निर्णय न झाल्यास मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पुण्यात झालेल्या 'हल्लाबोल' आंदोलनात देण्यात आला आहे.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या ‘हल्लाबोल’ आंदोलनात व बैठकीत प्रा. डॉ. जालंद्‍र पाटील, भगवान काटे, शिवाजी माने, वैभव कांबळे, नितीन पाटील, संदीप देसाई, सावकार मदनाईक, संभाजीराव चौगुले यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
📲Get App