🔥 TRENDING ભારતમાં સ્માર્ટફોનની કિંમતમાં વધારો, ખ... Odisha Marks Birth Anniversary of Mart... ಕೆ. ಬೇವಿನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಡಾ. ನಾಲ್ವಡಿ ಶಾಂತಲಿ... મહેસાણામાં પેરોલ જમ્પ થયેલ કાચા કામના... દોસ્તાર પાસેથી ઉધાર લીધી કારમાં દુર્ઘટ... Odisha Tourism Unveils New Website & I...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 10 Sep 2026, 05:02 PM 👁 79
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती असून त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली

भाद्रपद महिन्यातील अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो पोळ्याच्या दिवशी शेतातील वाहतूक व इतर सर्व कामे बंद ठेवून बैलांना विश्रांती दिली जाते सणाच्या दिवशी सकाळी बैलांना शेतात चारण्यासाठी नेतात दुपारी बैलांना गावाजवळील नदी किंवा तलावात नेऊन अंघोळ घातली जाते स्वच्छ धुऊन गोठ्यात त्यांच्या शिंगांना रंगीबेरंगी रंग लावला जातो बैलाच्या संपूर्ण अंगाला आकर्षक रंगवून गळ्यात घुंगराच्या माळा मोरकी पायात पैंजण आणि पाठीवर नक्षीदार झुला टाकला जातो डोक्यावर फुलांच्या हार घालून नवरदेवासारखा साज घालून सजविले जाते बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो
संध्याकाळी गावाच्या प्रवेशद्वारातून वाजत गाजत गावातून बैलांची मोठ्या दिमाखात शोभायात्रा काढली जाते प्रत्येकाच्या घराघरात जाऊन बैलाची पूजा करून ओवाळतात आणि पुरण पोळीचा गोड घास नैवेद्य म्हणून भरवतात
📲Get App