🔥 TRENDING करंडे थाना पुलिस ने दीपावली पर महिलाओं... दीपावली के दिन समस्तीपुर में भीषण आग ल... जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा, म... दीपावली पर पीड़ित परिवार से मिले विधाय... हजारीबाग दारू NH-522 पर सूखे पेड़ों के... ब्रेकिंग न्यूज़
09 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

शेतकरी बांधवांनो, आपल्या हक्कासाठी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहूया!

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 09 Nov 2026, 10:45 AM 👁 112
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शेतकरी बांधवांनो, आपल्या हक्कासाठी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहूया!

🌾🚩 शेतकरी बांधवांनो, आपल्या हक्कासाठी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहूया! 🚩🌾

माझ्या तमाम शेतकरी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती...

गेल्या दहा-बारा दिवसांपासून शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय घनश्यामभाई ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून अहोरात्र संघर्ष करत आहेत.

दिवाळीसारखा आनंदाचा सणसुद्धा त्यांनी आंदोलनस्थळी साजरा केला. स्वतः ऊस उत्पादक नसतानाही केवळ आपल्या शेतकरी बांधवांच्या न्यायासाठी ते मैदानात ठामपणे उभे आहेत.

आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत होतो, पण घनश्यामभाई आपल्या हक्काच्या लढ्यासाठी संघर्ष करत होते. त्यांच्या या त्यागाची जाणीव आपण ठेवली पाहिजे.

जोपर्यंत आपल्या उसाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही!

उद्या या आंदोलनामध्ये काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज घनश्यामभाई आपल्यासाठी लढत आहेत, मग उद्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य नाही का?

आपण फक्त घरी बसून आंदोलनाला पाठिंबा देऊन चालणार नाही. आपल्या उपस्थितीनेच या लढ्याला खरी ताकद मिळेल.

म्हणून परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उद्या मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहावे, ही माझी मनापासून कळकळीची विनंती आहे.

आपल्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहूया!

🙏 घनश्यामभाईंच्या संघर्षाला आपली साथ देऊया.
🚩 शेतकरी एकजूट जिंदाबाद!
🚩 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विजय असो!
🚩 जय जवान, जय किसान!
📲Get App