🔥 ट्रेंडिंग थाने पुलिस ने 3 करोड़ की मेफेड्रोन जब्... पालघर में 3.5 तीव्रता का भूकंप पंढरपुर में 1.13 लाख श्रद्धालुओं का आग... भाजपा नेताओं ने इंस्टाग्राम पर बढ़ाई ग... दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवे दुर्घटना... ભાવનગર મ્યુનિસિપલ કોર્પોરેશનના આધાર ઓપ...
29 जुल. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमा निमित्त यात्रा उत्सव

श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमा निमित्त यात्रा उत्सव

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 27 जुल. 2026, 08:47 PM 👁 49

संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या महानुभाव पंथाची खानदेशातील काशी म्हणून ओळख

भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमा निमित्त दाढ विशेष दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात आषाढीपासून तर गुरुपौर्णिमे पर्यंत येथे भाविकांची मांदियाळी असते श्रीक्षेत्र कनाशी येथे भगवान श्रीकृष्णाची उपासना केली जाते अनेक साधुसंताचे या ठिकाणी विविध आश्रमाद्वारे वास्तव्य आहे श्री क्षेत्र कनाशी येथे बाराव्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जीर्णोद्धारासाठी अवता धारण केला आपल्या परिभ्रमणांनी महाराष्ट्राला धर्मभूमी स्थान देऊन वैभव प्राप्त करून दिले
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याने चक्रधर स्वामी म्हणजेच माहानूभाव पंथाचे आचार विचार होय ते येथील संपूर्ण गावकऱ्यांनी स्वीकारले आहे
पहाटे मंगल स्नान उटी गंध विडा अवसर.करून कार्यक्रमास सुरुवात झाली नंतर पूजा अभिषेक विधिवत पूजा सायंकाळी संपूर्ण गावातून देवाची पालखी मिरवणूक
मंदिर परिसरात विविध दुकाने मिठाई खेळणी पालखी इत्यादी दुकाने थाटली बाहेरगावाहून येणाऱ्या दिंडी पायी वारी आल्या असून भाविकांच्या सोयीसुविधीसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने तयारी करण्यात आली आहे
📲Get App