🔥 TRENDING Haryana Targets Singapore Investment f... Haryana CM Meets Punjab & Haryana Indu... Haryana CM Announces World-Class Conve... Chhattisgarh Deputy CM Calls Rahul Gan... Chhattisgarh HC questions citizenship... Four Bengal Brothers Detained in Chhat...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

श्री विघ्नहर साखर कारखाना चा ४१ वा गाळप हंगामाला मुळी टाकून सुरुवात

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 07 Oct 2026, 06:54 PM 👁 29
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री विघ्नहर साखर कारखाना ओझर या कारखान्याचा ४१ वा गाळप हंगामाची उसाचीमुळी टाकून सुरुवात.

श्री विघ्नहर साखर कारखाना जुन्नर/आंबेगाव या कारखान्याचे 41 वा गाळप हंगामाला उसाची मुळी टाकून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शिरूर लोकसभेची खासदार श्री अमोल कोल्हे तसेच जुन्नर चे आमदार श्री शरद सोनवणे तसेच माजी आमदार दिलीप ढमढेरे तसेच माजी आमदार अतुल शेठ बेनके व सभापती संजयराव काळे याप्रसंगी उपस्थित होते. प्रथेप्रमाणे गव्हाणीची पूजन करण्यात आले याप्रसंगी कर्मचारी शेतकरी सभासद मान्यवर मंडळ उपस्थित होते पूजन झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते मुळी टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी भविष्यात भेडसवणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थिती चिंता व्यक्त केली असून पुढील काळातील नियोजन शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे करावी असे आवाहन केले आहे तसेच कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशिल शेरकर यांनी यावर्षी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच उद्दिष्ट ठेवले आहे यावर्षी शासनाने लवकर गाळपा करावे अशा सूचना शासन दिल्यानंतर ट्रॅक्टर ट्रक मजूर मशिनरी सज्ज करण्याचं काम पूर्ण झाले असून कारखाना सर्वतोपरी शेतकऱ्यांची मदत करणार आहे याप्रसंगी आमदार शरद सोनवणे बाजार समितीचे सभापती श्री संजय राव काळे यांची सुद्धा भाषण झाली भविष्याचा काळात शेतकऱ्यांनी पाण्याची नियोजन करून शेती केली पाहिजे आणि आपलं कुटुंब कसे सुखी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे आपला जुन्नर तालुका कृषीप्रधान जरी असला तरी ह्या वर्षी बऱ्याच राज्यांमध्ये दुष्काळ आहे याची जर आपल्या तालुक्याला सुद्धा बसली आहे सध्या सोयाबीन तसेच ऊस या पिकांना धोका निर्माण झाला आहे यासाठी दक्षता घेणे पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशिल सरकर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सांगता झाली
📲Get App