🔥 ट्रेंडिंग India's First Fully Indigenous Multi‑P... Central Government Drops "Indira Gandh... महाड एमआयडीसीमध्ये रासायनिक उद्योगातील... Parents of Ankita Bhandari demand remo... ਤਕਨਾਲੋਜੀ ਦੇ ਖੇਤਰ 'ਚ ਆ ਗਈ ਉੱਡਣ ਵਾਲੀ ਕਾਰ Opposition Parties Petition Supreme Co...
16 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान (कापूरहोळ व पंचक्रोशी) यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरी येथे शिष्यवृत्ती व शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 16 अक्टू. 2026, 11:08 AM 👁 21
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोरमधील सारोळा येथील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, आर्थिक अडचणींवर मात करून त्यांनी शैक्षणिक प्रगती साधावी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लागावा, या उदात्त हेतूने श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान (कापूरहोळ व पंचक्रोशी) यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरी येथे शिष्यवृत्ती व शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले असून, परिसरातून या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

या उपक्रमांतर्गत मोहरी व पंचक्रोशीतील आठ गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच मोहरी गावातील दोन्ही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व इतर आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले. शैक्षणिक साहित्याच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लागला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजातील दातृत्वाची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गाडे, सल्लागार सोमनाथ कुलकर्णी, जनसेवा सहकारी बँक सासवड शाखेचे व्यवस्थापक दत्तात्रय गाडे, मोहरीचे माजी सरपंच सागर पांगारकर, विकास सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दत्तात्रय बोडरे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पांगारकर, महेंद्र पांगारकर, नाना पांगारकर, निवृत्ती पांगारकर, गोपाळ पांगारकर, नितीन कांबळे, कापरे सर, सुवर्णा शेडगे, मोनाली पांगारकर, उषा पांगारकर, नीता पांगारकर, राजश्री बिऱ्हामणे, पल्लवी लेकावळे आणि सुवर्ण पांगारकर यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
📲Get App