🔥 ट्रेंडिंग ਗੰਨਾ ਉਤਪਾਦਕਾਂ ਦੀ ਬੱਲੇ-ਬੱਲੇ! ਮਾਨ ਸਰਕਾਰ... थाने महानगरपालिका: कलवा पूर्व में NDRF... 75 साल कि उम्र 5मोदी बने प्रधानमंत्री... एपी ने सेवानिवृत्त ट्रांसपोर्ट कर्मचार... 46,000 पुलिस कर्मी 26 नवंबर को आंध्र प... साइकलोन मुरासु के आने से पहले एनडीआरएफ...
25 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

शिरूरमधील पाच वर्षांपासून रखडलेल्या अतिक्रमण नियमितीकरणाला अखेर प्रशासकीय गती; अनिल मल्लाव यांच्या पाठपुराव्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे नगरपरिषदेला आदेश!

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 25 नव. 2026, 04:48 PM 👁 26
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्तक्षेपाची दखल

शिरूरमधील पाच वर्षांपासून रखडलेल्या अतिक्रमण नियमितीकरणाला अखेर प्रशासकीय गती; अनिल मल्लाव यांच्या पाठपुराव्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे नगरपरिषदेला आदेश!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्तक्षेपाची दखल; गट क्रमांक १७५१/अ आणि १२११ मधील निवासी अतिक्रमण प्रकरणाच्या तातडीच्या निपटाऱ्याचे निर्देश

शिरूर | प्रतिनिधी | २५ नोव्हेंबर २०२६

शिरूर शहरातील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवासी अतिक्रमण नियमितीकरणाच्या प्रश्नाला अखेर प्रशासकीय स्तरावर गती मिळाली आहे. गट क्रमांक १७५१/अ आणि १२११ मधील अतिक्रमण नियमितीकरणाच्या प्रस्तावाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दिवाणजी मल्लाव यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

शिरूर नगरपरिषद प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असताना सर्वसामान्य नागरिकांना आपल्या निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी प्रशासकीय प्रक्रियेचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मल्लाव यांनी थेट मंत्रालयाचे दरवाजे ठोठावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर निवेदने सादर केली होती.

मंत्रालयातील पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश

दि. २ एप्रिल २०२६ रोजी अनिल मल्लाव यांनी मुंबई मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन अतिक्रमण नियमितीकरणाबाबत सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी हे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले. नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या स्वाक्षरीने दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठविण्यात आले. सदर पत्र दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात प्राप्त झाले असून, अर्जातील सर्व मुद्द्यांची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही व सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडेही पाच वर्षांच्या विलंबाची चौकशी करण्याची मागणी

प्रकरण पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने अनिल मल्लाव यांनी दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले होते. संबंधित अतिक्रमण नियमितीकरण प्रस्तावावर तातडीने अंतिम निर्णय घेण्यात यावा, तसेच पाच वर्षांपासून हा विषय प्रलंबित राहण्यामागील कारणांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

कायदेशीर तरतुदींच्या आधारे विशेष समिती स्थापन करण्याची मागणी

या प्रकरणात अनिल मल्लाव यांनी केवळ निवेदने देण्यापुरता पाठपुरावा न करता मोजणी अहवाल, आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर तरतुदींच्या आधारे प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, दि. ५ मार्च २०२६ चा शासन निर्णय तसेच केंद्र व राज्य शासनाच्या 'सर्वांसाठी घरे – २०२२' या धोरणातील तरतुदींचा संदर्भ त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

या प्रकरणाचा कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेख विभाग, शिरूर नगरपरिषद आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करून तातडीने बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष; मल्लाव यांनी उचलला प्रश्न

निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेत नगरपरिषद प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असतानाही गेल्या पाच वर्षांपासून हा विषय प्रलंबित राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत न्याय मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

अशा परिस्थितीत श्री. अनिल दिवाणजी मल्लाव यांनी या प्रश्नात लक्ष घालून स्थानिक प्रशासनापासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे प्रलंबित प्रकरणाला प्रशासकीय स्तरावर गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेली ही धडपड महत्त्वपूर्ण ठरत आहे.

अंतिम निर्णयाकडे शिरूरकरांचे लक्ष; अन्यथा न्यायालयीन लढा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत पत्रानंतर आता शिरूर नगरपरिषद प्रशासन या प्रकरणात कोणती कार्यवाही करते आणि अंतिम निर्णय कधी घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. केवळ पत्रव्यवहार करून हा प्रश्न प्रलंबित न ठेवता संबंधित नागरिकांना नियमानुसार न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणात न्याय्य, पारदर्शक आणि कायदेशीर कार्यवाही केली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सक्षम न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अनिल मल्लाव यांनी दिला आहे.

पाच वर्षांपासून रखडलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला मंत्रालयीन स्तरावर आवाज देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यवाहीचे निर्देश मिळवून देण्याची भूमिका अनिल मल्लाव यांनी बजावली आहे. आता शिरूर नगरपरिषद प्रशासनाने या संधीचे गांभीर्य ओळखून संबंधित नागरिकांना नियमानुसार न्याय द्यावा, हीच शिरूरकरांची अपेक्षा आहे.
📲Get App