🔥 TRENDING સુરતના એ.આર. મોલમાં યુવતીનો પીછો કરી અ... વડોદરા: જ્યુબિલીબાગ પાસે ડ્રેનેજ કામગી... Tamil Nadu to Disable PDS Cards If Rat... Tiruvannamalai Residents Protest Propo... Tamil Nadu Nurses Launch Hunger Strike... Monsoon Expected to Withdraw from Madh...
01 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेळदच्या शासकीय निवासी शाळेत ९ फूट धामण

✍️ Reporter: Sharad Keshav Shegokar 🗓 01 Oct 2026, 09:22 AM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सर्पमित्र दीपक लोड यांच्याकडून सापाला नैसर्गिक अधिवासात जीवदान

बाळापूर : शेळद येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील (वस्तीशाळा) स्नानगृहात तब्बल ९ फूट लांबीचा भलामोठा धामण जातीचा साप निघाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्राने तातडीने धाव घेत सापाला शिताफीने पकडून जंगलात सुरक्षित सोडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शाळेच्या महिला सुरक्षा रक्षक विशाखा तायडे यांना स्नानगृहात हा अजस्र साप निदर्शनास आला. त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ वन्यजीव संवर्धन बहुउद्देशीय संस्था, पारसचे उपाध्यक्ष तथा सर्पमित्र दीपक लोड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र दीपक लोड यांनी कसलाही विलंब न करता थेट शाळा गाठली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षिततेची काळजी घेत सुमारे ९ फूट लांबीच्या धामण सापाला सुखरूप जेरबंद केले. त्यानंतर या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्त करण्यात आले.

सापाला पकडल्यानंतर दीपक लोड यांनी उपस्थित विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सर्प जनजागृती केली. "धामण हा पूर्णपणे बिनविषारी आणि शेतातील उंदरांचा नायनाट करणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. त्यामुळे मानवी वस्तीत साप आढळल्यास त्याला इजा न पोहोचवता किंवा न मारता तातडीने सर्पमित्रांना पाचारण करावे," असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली. दीपक लोड यांनी यापूर्वीही अनेक विषारी व बिनविषारी सापांना मानवी वस्तीतून सुरक्षित बाहेर काढल्याने त्यांच्या या वन्यजीव संवर्धनाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📲Get App