🔥 ट्रेंडिंग स्थानीय मंदिर में चोरी की घटना, दान पा... ओडिशा ने वैश्विक निवेशकों को आकर्षित क... श्री सिटी SEZ में बॉयलर विस्फोट से पां... नर लुकेश ने कहा, भारत को क्वांटम टेक म... अंध्र प्रदेश में सितंबर में जीएसटी संग... पूर्व गुजरात सीएम कांग्रेस के लिए गंधी...
03 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एसटीचा मोठा दिलासा: आता NCMC कार्ड थेट शाळेतच मिळणार.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 03 अक्टू. 2026, 07:56 PM 👁 33
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक ३/१०/२०२६
मुरबाड ठाणे विशेष वार्ता पत्र
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया आता थेट शाळांमध्येच राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक एसटी आगार किंवा ई-सेवा केंद्रांना जाण्याच्या त्रासातून मुक्त होतील. महामंडळाचे अधिकृत प्रतिनिधी शाळांना भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेणे अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारे ठरेल.

या नवीन NCMC स्मार्ट कार्डला विद्यार्थ्यांचा सरल आयडी जोडला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आणि मिळणाऱ्या प्रवास सवलतींची नोंद डिजिटल पद्धतीने सुरक्षित राहील. महामंडळाने स्पष्ट आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांनी शाळेकडून मिळालेल्या सूचनांनुसारच नोंदणी करावी. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा केंद्राकडे वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नयेत. ही खबरदारी घेतल्यास फसवणुकीपासून बचाव होईल आणि प्रक्रिया सुरळीत पार पडेल..एसटीच्या या योजनेत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर सवलतधारक प्रवाशांचाही समावेश आहे. नवीन NCMC कार्डची किंमत जीएसटीसह १९९ रुपये आहे. जुने स्मार्ट कार्ड जमा करून नवीन कार्ड घेणाऱ्यांना १४९ रुपये शुल्क मोजावे लागेल. कार्डमध्ये सुरुवातीला किमान १०० रुपयांचा रिचार्ज करता येईल, तर त्यानंतर ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. ही सुविधा विद्यार्थ्यांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची हमी देईल.
📲Get App