🔥 ट्रेंडिंग बदायूं के इस्लामनगर में गौशाला में कुत... मुंबई के बांद्रा में रेस्तरां में लगी... अमेरिका में गांधी परिवार की 30 एकड़ जम... 16 राज्यों में मौसम का बड़ा अलर्ट! तूफ... मुरबाड आणि कल्याणमध्ये काळी-पिवळी टॅक्... मुरबाड आणि कल्याणमध्ये काळी-पिवळी टॅक्...
30 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

शहाद्याच्या इतिहासात ऐतिहासिक निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा आता सरदार वल्लभभाई पटेल मार्केट यार्ड म्हणून ओळखले जाणार

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 30 अक्टू. 2026, 09:26 AM 👁 107
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहाद्याच्या इतिहासात ऐतिहासिक निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा आता सरदार वल्लभभाई पटेल मार्केट यार्ड म्हणून ओळखले जाणार

*हेडलाईन: शहाद्याच्या इतिहासात ऐतिहासिक निर्णय: कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा आता ‘सरदार वल्लभभाई पटेल मार्केटयार्ड’ म्हणून ओळखले जाणार; २९ ऑक्टोबरला भव्य नामकरण सोहळा*

*शहादा (नंदुरबार):* शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे अखंड भारताचे शिल्पकार शेतकऱ्यांचे कैवारी आणि देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा या आवाराला ‘सरदार वल्लभभाई पटेल मार्केटयार्ड, शहादा’ असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या सरदार पटेलांच्या नावाने बाजार समितीचे नामकरण होणे, हा शहादा तालुक्यातील लाखो शेतकरी बांधवांचा गौरव आहे. बारडोली सत्याग्रहापासून ते देशाच्या एकीकरणापर्यंत सरदार पटेलांनी नेहमीच शेतकरी आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले.

या ऐतिहासिक नामकरण सोहळ्याचे औचित्य साधून ‘संगीतमय सरदार गाथा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमात सरदार पटेलांच्या जीवन संघर्षावर, त्यांच्या विचारांवर आणि देश उभारणीतील त्यांच्या अमूल्य योगदानावर आधारित संगीतमय सादरीकरण झाले
या सोहळ्यास शहादा शहरासह परिसरातील सर्व शेतकरी बांधव, व्यापारी, माथाडी कामगार, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अभिजीत पाटील म्हणाले की कुणाचीही पाठबळ नसताना बाजार समितीत 25 कोटीचे विकास कामे सुरू आहेत यावेळी शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोतीलाल तात्या पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील जयपाल सिंग रावल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत दादा पाटील उपसभापती रवींद्र पाटील संचालक मंडळातील सदस्य दगडू पाटील विजय नरतम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज पाटील नंदकिशोर पटेल डॉक्टर सुरेश चौधरी डॉक्टर सुरेश नाईक जगदीश पाटील अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील कन्हैया पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष भिका आप्पा पाटील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीती पाटील साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मानक चौधरी नंदुरबार जिल्हा केळी फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष बुद्ध पाटील माजी नगरसेवक के डी पाटील कृषी भूषण हिरालाल अण्णा पाटील सेवानिवृत्त वनाधिकारी नामदेव पटेल बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर किशोर चौधरी, रमेश सेठ जैन डॉक्टर किशोर पाटील हेमंत पाटील आणि तालुका एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पटेल यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी संचालक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी व शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले
📲Get App