🔥 TRENDING హనుమకొండ ప్రజావాణి: 309 అర్జీల స్వీకరణ કૃષ્ણ જન્મોત્સવની ઉજવણીમાં ભક્તોનો હર્... उत्तर प्रदेश के जिला सीतापुर थाना बिसव... હિંમતનગરમાં પ્લાસ્ટિક મુક્ત અભિયાન: ના... Iran Consulate Shares Unexpected Prabh... Chiranjeevi's Netflix Deal Beats His F...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेगाव गजानन महाराज संस्थानाकडून एक कोटी आकरा लाखांची मदत

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 28 Sep 2026, 02:28 PM 👁 31
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य

: शेगांव गजानन महाराज संस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाखाची मदत
, दिनांक २७ रोजी यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिली असून संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शेगांव श्री गजानन महाराज संस्थान (पब्लिक ट्रस्ट रजि.नं. ए-२५० बुलडाणा) या न्यासाच्या वतीने "मुख्यमंत्री सहाय्यता निधीसरू. १ कोटी ११ लाखाचा सहयोग निधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना दि. २७/०९/२०२६ रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे.

सदर मदत निधी हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक सहाय्य, पाणीपुरवठा, पशुखाद्य व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी वापरण्यात येणार आहे.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव नेहमीच समाजकल्याण व मानवसेवेस कटिबद्ध राहून गरजेच्या प्रसंगी मदतीसाठी अग्रेसर आहे.
📲Get App