🔥 ट्रेंडिंग स्थानीय स्कूल की टीम ने जीता राज्य स्त... नवरात्रि के सप्तम दिवस पर माँ कालरात्र... यूपी पुलिस में बंपर भर्ती, सिपाही और ज... पूर्णिया में शारदीय नवरात्रि के सप्तम... सभी जिलों में आज की नई खबरें फारबिसगंज में बड़ा शिवालय पूजा समिति द...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

सोयाबीनच्या काढणीला वेग अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात घट

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 17 अक्टू. 2026, 06:04 PM 👁 28
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सोयाबीनच्या काढणीला वेग अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात मात्र घट

जुन्नर मधील अनेक भागात सोयाबीनचे काढणीला वेग आला असून मात्र अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे दरवर्षी सरासरी सोयाबीनची एकरी 10ते12 पोती होत असतात परंतु यावर्षी 6 ते 8 पोती सरासरी अवरेज आहे पाऊस कमी झाल्यामुळे लोकांनी पाण्याची व्यवस्थापन ज्यांनी केली त्यांनाच उत्पन्न चांगले झाले आहे बाजार भाव प्रति किलो 70 रुपये आहे परंतु खर्च मजुरी भांडवल यामुळे सोयाबीन यावर्षी परवडत नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले सोयाबीनच्या भरोशावर पुढील पिके कांदा गहू हरभरे अशी पिके घेतली जातात परंतु यावर्षी खर्च न भागल्यामुळे पुढील मालांची नियोजन कोलमडले आहे शेतकरी चिंतेत आहे सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असून त्यामध्ये काहीही होऊ शकत नाही असे शेतकऱ्यांची मत आहे त्यामुळे मायबाप सरकारने भरीव मदत करावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आले आहे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील काळात पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी याची व्यवस्थापन कसे करायचे हे शेतकऱ्यांकडे मोठी गंभीर समस्या बनली आहे पुढे येणारी सण दसरा दिवाळी कसा साजरा करायचा यासाठी शेतकरी चिंतेत आहे
📲Get App