🔥 TRENDING देवरिया के नेशनल हाईवे पर बोलेरो टक्कर... निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनो... निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनो... सुमेरपुर बस स्टैंड की बदहाल सड़कें, दी... mathura अहोई अष्टमी पर सुरक्षा के कड़े... ਸੋਸ਼ਲ ਮੀਡੀਆ 'ਤੇ ਮਸ਼ਹੂਰ ਪੰਜਾਬ ਦੇ ਇਸ ਇੰਫਲੂ...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सोयाबीन तेलाचा २७१० किलो साठा जप्त; रवी ऑइल इंडस्ट्रीजचा अन्न परवाना निलंबित...!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 02 Nov 2026, 04:53 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
४.८७ लाखांचा खाद्यतेल साठा FDA च्या ताब्यात; तपासणीत अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड

विभागीय प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मोठी कारवाई केली आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील मे. रवी ऑइल इंडस्ट्रीज या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकून तब्बल २ हजार ७१० किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची बाजारभावानुसार किंमत ४ लाख ८७ हजार रुपये असून, संबंधित उद्योगाचा FSSAI अन्न व्यवसाय परवानाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी केलेल्या अचानक तपासणीत संबंधित उद्योगात अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान निर्धारित ८६ गुणांपैकी उद्योगाला अवघे ३० गुण मिळाले. म्हणजेच एकूण गुणांच्या तुलनेत केवळ ३५ टक्के गुणांची नोंद झाली. परवान्यावर जनरल मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन व्यवसायाची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र तेलाचे रिपॅकिंग केले जात असल्याचेही उघड झाले.

तपासणीत खाद्यतेल आणि पाण्याच्या प्रयोगशाळा तपासणीचे अहवाल उपलब्ध नसणे, पॅकिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्र नसणे, तसेच उत्पादन परिसरात पुरेशा वायुवीजनाची व्यवस्था नसल्याचे आढळले. खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नसणे आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा साहित्याचा अभाव अशा त्रुटीही समोर आल्या.

इतकेच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या नोंदी, यंत्रसामग्रीची देखभाल, उत्पादन प्रक्रियेतील वेळ व तापमान नियंत्रण आणि खाद्यपदार्थ बाजारातून परत मागवण्यासंदर्भातील आवश्यक योजनेच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

या गंभीर त्रुटींची दखल घेत सहायक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी रवी ऑइल इंडस्ट्रीजचा FSSAI अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. परवाना निलंबित असेपर्यंत संबंधित उद्योगाला उत्पादन, प्रक्रिया तसेच विक्री करता येणार नाही.

दरम्यान, उद्योग व्यवस्थापनाने सर्व त्रुटींची पूर्तता करून त्यासंबंधीचे पुरावे प्रशासनाकडे सादर केल्यानंतर फेरतपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीच्या निष्कर्षांनंतरच परवाना निलंबनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. FDA च्या या कारवाईमुळे खाद्यतेल उद्योगांमधील अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
📲Get App