🔥 TRENDING Pro-Kannada Group Demands Local Jobs,... Karnataka to Reduce Nandini Curd Price... Bengaluru Celebrates 71st Karnataka Ra... Paddy Stubble Burning Drops 26.6% in S... Rajasthan HC: Wife can seek IVF indivi... Sharad Pawar Hospitalized for Chest Pa...
03 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

सर्पमित्र शेखर दयाल पाल : सापांचा खरा मित्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!

✍️ Reporter: Dr: PINTU PAUL 🗓 02 Nov 2026, 11:43 PM 👁 47
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सर्पमित्र शेखर दयाल पाल : सापांचा खरा मित्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!

सर्पमित्र शेखर दयाल पाल : सापांचा खरा मित्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!
चिचपल्ली : चिचपल्ली गावातील रहिवासी शेखर दयाल पाल हे खऱ्या अर्थाने सर्पमित्र असून, ते सापांचेही मित्र आणि नागरिकांचेही रक्षक ठरत आहेत. चिचपल्ली तसेच परिसरातील कोणत्याही गावात साप आढळल्याची माहिती मिळताच केवळ एका फोनवर शेखर पॉल मदतीसाठी तत्परतेने हजर होतात.
नाग असो, अजगर असो किंवा अन्य कोणताही विषारी अथवा बिनविषारी साप, त्याची भीती मनात न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात न घालता योग्य काळजी व सुरक्षिततेचे नियम पाळून ते सापाला पकडण्याचे काम करतात. त्यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सुरक्षितपणे सोडून देतात.
साप दिसल्यानंतर अनेक नागरिक घाबरून जातात. अशा वेळी सापाला मारण्याऐवजी सर्पमित्राला बोलावून त्याचे प्राण वाचवणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा संदेश शेखर पॉल आपल्या सेवाकार्यातून देत आहेत.
कोणतीही अपेक्षा न ठेवता निसर्गसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन कार्य करणारे आपले लाडके शेखर दयाल पाल हे चिचपल्ली परिसरासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
साप मारू नका, सर्पमित्रांना बोलवा आणि वन्यजीवांचे संरक्षण करा!
📲Get App