🔥 TRENDING Three Police Officers Suspended After... सिकती प्रखंड के ढेंगरी गांव में नंगे ब... शाहपुरा मनोहरपुर से दौसा तक 62.20 KM स... कलेक्टर ने सीएम हेल्पलाइन में ग्रेड‑ए... कुत्ते को बचाने के प्रयास में बाइक सवा... હારીજ નગરપાલિકામાં રજૂઆત કરવા ગયેલા ના...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

सरळगाव विभाग हायस्कूलच्या १९७९-८० बॅचचा 'ऋणानुबंध' माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 23 Nov 2026, 07:25 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार
दिनांक २४/११/२०२६.
विशेष वृत्त
ठाणे मुरबाड : सरळगाव विभाग हायस्कूल, सरळगाव येथील इयत्ता १० वी (एस.एस.सी.) बॅच सन १९७९-८० च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ‘॥ ऋणानुबंध ॥’ रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पोटगाव (ता. मुरबाड) येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या चित्रांगण रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
गुरुवर्य कोठावले सर, वाघुळदे सर व इतर मान्यवर गुरुवर्यांच्या प्रमुख सानिध्यात हा सोहळा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रांतून आणि महत्त्वाच्या हुद्द्यांवरून सेवानिवृत्त झालेले सुमारे ३० माजी विद्यार्थी (सवंगडी) तब्बल ४६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे उभे राहून शालेय प्रार्थना व प्रतिज्ञा म्हटली, ज्यामुळे शालेय काळातील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुवर्य कोठावले सर, वाघुळदे सर व उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.
निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यात भजन आणि अंताक्षरीचा बहारदार कार्यक्रम रंगला, ज्यात सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे बोधपर मार्गदर्शन केले व शुभाशीर्वाद दिले. तसेच, विविध पदांवरून निवृत्त झालेल्या माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत जुने किस्से आणि शाळेने दिलेल्या संस्कारांचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे, पुढील वर्षीचा स्नेहमेळावा वांगणी येथे दिव्यांगांच्या सानिध्यात साजरा करण्याचा स्तुत्य संकल्प यावेळी सर्वानुमते करण्यात आला. शेवटी सर्वांनी एकमेकांना पुढील वाटचालीसाठी व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत या अविस्मरणीय सोहळ्याचा निरोप घेतला.
📲Get App