🔥 TRENDING Goa Man Receives Two Daily Job Offers... KVK Dimapur Celebrates World Food Day... Kuki-Zo Woman Killed and Couple Missin... औरंगाबादच्या हिमायत बागेत वाहतूक कोंडी... Kangpokpi Leaders Demand Deputy CM Nem... Manipur to Overhaul Youth and Sports P...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरळगाव व खुटल बंगला येथे 'उन्नती प्रकल्पांतर्गत' महिला व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण; उत्स्फूर्त प्रतिसाद.
Lifestyle

सरळगाव व खुटल बंगला येथे 'उन्नती प्रकल्पांतर्गत' महिला व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण; उत्स्फूर्त प्रतिसाद.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 16 Oct 2026, 06:49 PM 👁 21
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १६/१०/२०२६.
ठाणे.मुरबाड. सरळगाव:
आर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि IFF यांच्या संयुक्त विद्यमाने, त्यांच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'उन्नती प्रकल्पाच्या' माध्यमातून नुकतेच सरळगाव आणि खुटल बंगला येथे महिला व शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या दोन्ही उपक्रमांना महिला आणि स्थानिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत सरळगाव येथे दोन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एकूण ५७ महिलांनी सहभाग घेतला. या प्रसंगी महिलांना उद्योजकतेची मूळ संकल्पना, व्यवसायाच्या नवीन संधी ओळखणे, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचे उत्पन्न कसे वाढवावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेला व्यवसाय अधिक सक्षम आणि वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती व बळ मिळाले.
तसेच, खुटल बंगला येथे गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत व पूरक शेती व्यवसायाला चालना देणाऱ्या या प्रशिक्षणात एकूण ४५ महिला व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये गांडूळखत तयार करण्याची प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि त्याचे शेतीतील महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांना उद्योजकता व शेतीपूरक व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही प्रशिक्षण वर्गांचे परिसरातून कौतुक होत आहे.
📲Get App