🔥 ट्रेंडिंग കർമ്മശ്രേഷ്ഠ പുരസ്‌കാരം 25 ന് നൽകും छठ के दौरान समस्तीपुर रेलवे जंक्शन पर... લીલીયા પોલીસ પરિવારની માનવતાભરી પહેલ:... NEED24 NEWS JHARSUGUDA -ODISHA ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಹಾಗೂ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ... आउटलुक इंडिया ने 13 नवंबर 2026 के लिए...
13 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सोलापूर जिल्हा परिषदेसमोर पंचप्पा काळे दाम्पत्याचे बेमुदत उपोषण मनपुरम गोल्ड लोन फायनान्स आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात सत्याग्रह

✍️ रिपोर्टर: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 13 नव. 2026, 12:16 PM 👁 10
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सोलापूर जिल्हा परिषदेसमोर पंचप्पा काळे दाम्पत्याचे बेमुदत उपोषण
मनपुरम गोल्ड लोन फायनान्स आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात सत्याग्रह
सोलापूर : मनपुरम गोल्ड लोन फायनान्सच्या एस.टी. स्टँड परिसरातील शाखेतील व्यवस्थापक वैशाली हुंiडेकरी व संबंधित फायनान्सविरोधात तसेच फौजदार चौकडी पोलीस स्टेशनमधील तपास अधिकारी सतीश बावणे (PSI) आणि दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या विरोधात पंचप्पा अर्जुन काळे व अबुबाई पंचप्पा काळे यांनी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित प्रकरणाची चौकशी अर्धवट करण्यात आली असून, धमकीमुळे योग्य तपास न करता केस फाईल करण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी व फायनान्स व्यवस्थापनाच्या भूमिकेची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी पंचप्पा अर्जुन काळे व अबुबाई पंचप्पा काळे यांनी केली आहे.
या मागण्यांसाठी पंचप्पा अर्जुन काळे आणि अबुबाई पंचप्पा काळे यांच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषद येथील पुनम गेट परिसरात सत्याग्रह व बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.
संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
📲Get App