🔥 TRENDING [29/09, 2:03 pm] Jiwan Kumar: ਮੰਡੀ ਕਲਾ... બોટાદ જિલ્લા કોંગ્રેસ દ્વારા SIR મુદ્દ... અંજારમાં ખેડૂતો પાસેથી રકમની વસૂલાત સા... One dead in road accident at Badarpur,... Amit Shah Announces Disruption of 40 C... The420.in Releases Daily Cyber Crime A...
29 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सिल्लोडजवळ एसटी बसचा भीषण अपघात; ब्रेक फेलमुळे २९ प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती चिंताजनक....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 29 Sep 2026, 02:50 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील मुखापाठ फाट्यावर सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी ९ वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण २९ प्रवासी जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३६) मुखापाठ फाट्याजवळ आली असता ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव बसने समोर पोकलेन मशीन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला (एनएल ०१ एल ७६१५) मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की पोकलेनची सोंड थेट बसमध्ये घुसली.

अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना प्रथम सिल्लोड ग्रामीण आणि अजिंठा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींपैकी ८ प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित २१ जखमींवर सिल्लोड आणि अजिंठा येथे उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

नुकसानीचा अंदाज
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात ब्रेक फेल झाल्याने झाला आहे. मात्र सुरक्षित अंतर न पाळल्यानेही अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यात बसच्या समोरील काच, गिअरबॉक्स, स्टिअरिंग आणि हेडलाईटचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा पोलीस करत आहेत.
📲Get App