🔥 ट्रेंडिंग असम BJP ने मौजूदा NRC को खारिज किया, व... चिटकारा विश्वविद्यालय के हॉस्टल में प्... असम राइफल्स ने 2026 ट्रेड्समैन भर्ती र... બાબરા તાલુકાના નીલવળા ગામમાં દેશી દારૂ... असम में टिपर ट्रक में छिपे 20 किलोग्रा... असम में फिर एक पुलिस ‘एन्काउंटर’, सुप्...
15 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

🚩 संचालक रात्रभर गव्हाणीवर! मेहनतीतून गाळपाचा नवा विक्रम! 🚩

✍️ रिपोर्टर: Suhas Tagare 🗓 15 नव. 2026, 11:25 AM 👁 24
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

🚩 संचालक रात्रभर गव्हाणीवर! मेहनतीतून गाळपाचा नवा विक्रम! 🚩

🚩 संचालक रात्रभर गव्हाणीवर! मेहनतीतून गाळपाचा नवा विक्रम! 🚩

आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, संचालकांनी प्रत्यक्ष गव्हाणीवर उपस्थित राहून कामकाजात लक्ष घातल्यास गाळपात किती मोठी वाढ होऊ शकते, याचा प्रत्यय आज प्रत्यक्ष पाहायला मिळाला.

आमदार साहेबांच्या सूचनेनुसार संचालक उमेश काका मोरे, प्रवीण कोळेकर आणि गणेश ननवरे हे रात्रभर गव्हाणीवर ठाण मांडून उभे राहिले. स्वतः गव्हाणीवर उपस्थित राहून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबतीने संपूर्ण रात्र जागून गाळप करून घेतले.

याच मेहनतीचे फलित म्हणून आज एका पाळीमध्ये 3886 मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचा नवा विक्रम घडला, तसेच 11013 हजार मेट्रिक टन गाळप करून नवा विक्रम केला.

हा विक्रम केवळ आकड्यांचा नसून संचालकांची कामाप्रती असलेली बांधिलकी, अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सर्वांच्या एकजुटीचा परिणाम आहे.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन!

संचालक गव्हाणीवर उतरले, रात्रभर मेहनत घेतली आणि कारखान्याने नवा विक्रम घडवला!

💐 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अशीच विक्रमी वाटचाल सुरू राहो! 💐
📲Get App