🔥 ट्रेंडिंग *केन्द्र की सब्सिडी के अतिरिक्त राज्य... સાબરકાંઠા LCB દ્વારા હત્યાના ગુનામાં ફ... நாகர்கோவிலில் மதுமிதா வீட்டில் திருடிய... વલસાડ નજીક પુરઝડપે ગયેલી વેન્યૂ કારે ઇ... राजेन्द्रनगर में 34 वर्षीय पुरुष की हत... बॉलीवुड हंगामा ने शर्लिन चोपड़ा की फोट...
29 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

रावेर तालुक्यात सावदा पोलिसांची धडक कारवाई; ८५ किलो गोवंश मांसासह २१,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 29 सित. 2026, 04:35 PM 👁 17
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

लोहारा येथे पहाटेच्या सुमारास छापा, एक आरोपी जेरबंद तर दुसरा पसार; न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी

सावदा / जळगाव - रावेर तालुक्यातील लोहारा येथे बेकायदेशीररित्या गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यांवर सावदा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी ८५ किलो गोवंश मांसासह एकूण २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.२९ वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत लोहारा गावातील गुल्ली लोहारा परिसरात गोवंश कत्तल सुरू असल्याची खबर मिळाली. माहिती मिळताच पो.उपनि. राहुल सानप आणि सपोनि. गणेश फड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीस जागेवरच ताब्यात घेतले, तर दुसरा झाडा-झुडपांचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.

अटक व फरार आरोपी

सलीमखा महेमुदखा कुरेशी (वय ६६, रा. कसाईवाडा, रसूलपूर, ता. रावेर) - अटकेत

अकीलखा सलीमखा कुरेशी (रा. रसूलपूर, ता. रावेर) - फरार

अस्मान शहादुर तडवी (रा. गुल्ली लोहारा, ता. रावेर) - जागा मालक

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण २१,९००/- रुपये)

या कारवाईत पोलिसांनी ८५ किलो गोवंश मांस (किंमत १७,००० रु.), वजन काटा (३,००० रु.), लोखंडी सुरा (५०० रु.), कुन्हाड (४०० रु.) आणि ९०० रुपये रोख रक्कम असा एकूण २१,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात FIR No. 0242/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ), भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २७९, ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०५, ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील आरोपी सलीमखा कुरेशी यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
📲Get App