Crime
रत्नागिरीत गांजा तस्करी रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक
Watch on:
▶️ YouTube
रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काजरघाटी धार परिसरातून २ किलो १०० ग्रॅम गांजासह एक संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान, काजरघाटी धार परिसरातून एका संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. संशयिताकडून २ किलो १०० ग्रॅम गांजा तसेच एक दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव इम्रान मोहम्मद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथक काजरघाटी धार भागात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी शाईन दुचाकी क्रमांक एमएच-०८-बीबी-६७३६ वरून जाणारी व्यक्ती पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी त्याला अडवून विचारपूस केल्यानंतर अंगझडती घेतली, ज्यामध्ये त्याच्याकडे २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात, पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस कर्मचारी दिपू साळवी, शांताराम झोरे, अमित पालवे, दिनेश आखाडे आणि भालचंद्र मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे.