🔥 TRENDING Ludhiana MLA clashes with former minis... 6.7 kg Heroin Seized in Jalandhar as P... Students stage dharna at Punjab Agricu... Controversial Remarks by Jyani Prompt... Former Banker Ashish Ushaa Agrawal Nam... ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे...
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

रत्नागिरी: थिबा पॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला, नागरिकांमुळे संशयित ताब्यात

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 23 Sep 2026, 05:28 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक थिबा पॅलेस परिसरात एका मुलाला फुस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. आरडाओरड ऐकून जमा झालेल्या नागरिकांनी संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

रत्नागिरी : शहरातील ऐतिहासिक थिबापॅलेस परिसरात मंगळवारी सकाळी एका मुलाला फुस लावून पळवून नेण्याचा कथित प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. मुलाने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, थिबापॅलेस परिसरात बहुरूपी कलाकाराचा वेश परिधान केलेला एक मुलगा वावरत होता. त्याचवेळी एका अनोळखी तरुणाने मुलाला फुस लावून त्याला जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. संशयित व्यक्तीच्या हालचाली लक्षात आल्यानंतर मुलाने आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून जवळील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी संशयित तरुणाला पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची प्राथमिक चौकशी सुरू केली. चौकशीत संबंधित तरुण मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आल्याची माहिती आहे. मात्र, तो रत्नागिरीत कोणत्या कारणासाठी आला होता, मुलाला सोबत नेण्यामागील नेमका उद्देश काय होता आणि या घटनेमागे अन्य काही बाबी आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, या घटनेबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रसंगावधान राखून संशयिताला पकडल्याने संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
📲Get App