🔥 ट्रेंडिंग ಮ್ಯಾನ್ಮಾರ್ ವಾಯುದಾಳಿಯಲ್ಲಿ ಮೂರು ಸ್ಥಳಗಳಲ್... पर्निया में कुम्हरवा झावरी अमोर ने मध्... ಗೂಗಲ್, ಸ್ಪೇಸ್‌ಎಕ್ಸ್‌ ಜೊತೆ ಕ್ಲೌಡ್ ಸೇವೆ... बाजवा ने पंजाब में हथियारों और नशीले प... ईडी ने पंजाब के खाद्य अनाज घोटाले में... पंजाब नागरिक चुनाव: पुनः मतदान शांतिपू...
29 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – डॉ. एस. पी. राजगुरु

✍️ रिपोर्टर: Suhas Tagare 🗓 29 नव. 2026, 11:50 AM 👁 19
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – डॉ. एस. पी. राजगुरु

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – डॉ. एस. पी. राजगुरु

स्वेरी मध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण दिना’निमित्त व्याख्यान संपन्न

‘शिक्षण हे केवळ पदवी संपादन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, सर्जनशीलता, चिकित्सक विचारशक्ती आणि सामाजिक जबाबदारी विकसित करणारे साधन असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे.’ असे प्रतिपादन विटा (जि.सांगली) मधील बलवंत कॉलेजच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एस. पी. राजगुरु यांनी केले.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या सहकार्याने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत आणि इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या सहकार्याने ‘राष्ट्रीय शिक्षण दिना’ निमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२० (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी –एनइपी २०२०) या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विटा (जि.सांगली) मधील बलवंत कॉलेजच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एस. पी. राजगुरू हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकेतून उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२०’ मधील संधी, आव्हाने आणि भविष्यातील शिक्षणव्यवस्थेची दिशा समजून घेण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचे सांगून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२०’ चे धोरण काय आहे हे विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. राजगुरू हे पुढे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२०’ ची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, प्रमुख वैशिष्ट्ये आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेत घडणारे परिवर्तन याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील ५ प्लस ३ प्लस ३ प्लस ४ ही नवीन शैक्षणिक रचना, बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती, मातृभाषेतील शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली मल्टीपल एन्ट्री अँड एक्झीट सुविधा आणि अॅकडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) यांसारख्या महत्त्वपूर्ण संकल्पना स्पष्ट केल्या तसेच उच्च शिक्षणातील संशोधन, नवोपक्रम, डिजिटल शिक्षण, शैक्षणिक लवचिकता आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून फार्मसी शिक्षणाच्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, कॉम्प्युटेशनल फार्मास्युटिक्स आणि औद्योगिक प्रशिक्षण यांसारख्या आधुनिक संकल्पनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. यानंतर त्यांनी बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यावहारिक ज्ञान, संशोधनवृत्ती आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत’ असे आवाहनही डॉ.राजगुरु यांनी केले. डॉ. राजगुरू यांना पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून ते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शक आहेत. त्यांच्या नावावर पाच पेटंट मंजूर असून संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. जाधव, फार्मसी पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. एस. व्ही. मांडवे, आयआयसीचे अध्यक्ष डॉ. दिग्विजय रोंगे, प्रा. सौरभ कौलगी तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सारा धुमाळ व नितीशा लिगाडे यांनी केले तर आभार आयआयसी समन्वयक प्रा. अरविंद बगले यांनी मानले.
📲Get App