🔥 TRENDING Namma Run 2024 Draws 3,000 Runners Acr... Tamil Nadu’s Youth Trust Issues Intens... Supreme Court Calls Vijay Government's... Suniel Shetty Thanks MP CM Mohan Yadav... Seiren Eyes Expansion into Karnataka ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ನಗರದಲ್ಲಿ ಕನಿಕಾ ಶಾಲೆ ಹಿಂದೆ...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

राष्ट्रीय स्तरावरिल सरदार पटेल नर्मदा ट्रेकिंग मोहिमेत वाशिम च्या अथर्व चांगटेची यशस्वी भरारीट्रेकिंग.

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 27 Nov 2026, 03:20 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राष्ट्रीय स्तरावरिल सरदार पटेल नर्मदा ट्रेकिंग मोहिमेत वाशिम च्या अथर्व चांगटेची यशस्वी भरारीट्रेकिंग.

राष्ट्रीय स्तरावरील सरदार पटेल नर्मदा ट्रेकिंग मोहिमेत वाशिमच्या अथर्व चांगटेची यशस्वी भरारी
गुजरातमधील राष्ट्रीय एनसीसी ट्रेकिंग कॅम्पमध्ये सहभाग; ४०० कॅडेट्समध्ये वाशिमचे नाव उज्ज्वल
वाशिम - येथील श्री बाकलीवाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी तथा एनसीसी कॅडेट अथर्व निरज चांगटे याने गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘सरदार पटेल नर्मदा ट्रेकिंग मोहिम २०२६’ मध्ये यशस्वी सहभाग नोंदवून विद्यालयासह वाशिम जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे.दि. १७ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गुजरातमधील राजपीपळा (जि. नर्मदा) येथे या राष्ट्रीय एनसीसी ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अकोला यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा यांच्या निवड प्रक्रियेतून अथर्वची या मोहिमेसाठी निवड झाली होती. या शिबिरात महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आदी विविध राज्यांतील सुमारे ४०० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते.
उद्घाटन समारंभाने शिबिराची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या मोहिमेदरम्यान कॅडेट्सना दररोज सुमारे १० ते १२ किलोमीटरचे ट्रेकिंग करावे लागले. घनदाट जंगल, डोंगरदर्‍या, खडकाळ वाटा आणि अवघड चढ-उतारांचा अनुभव देणारा १३ किलोमीटरचा ‘जुना राज ट्रेक’ हा मोहिमेतील विशेष आकर्षणाचा आणि आव्हानात्मक टप्पा ठरला.या शिबिरादरम्यान कॅडेट्सना जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे भव्य दर्शन घेण्याची संधी मिळाली. तसेच कर्झन डॅम, सुंदरपुरा परिसर आणि कॅक्टस गार्डनमधील विविध दुर्मिळ वनस्पतींची माहिती घेऊन निसर्गाचा जवळून अभ्यास करता आला.ट्रेकिंगसोबतच साहसी खेळ, ड्रिल, माउंटिंग, क्लायंबिंग, विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिगेडियर दर्जाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सना शिस्त, नेतृत्वगुण, धैर्य, संघभावना आणि शारीरिक व मानसिक क्षमता विकसित करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या अनुभवाविषयी अथर्वने सांगितले की, हा ट्रेकिंग कॅम्प म्हणजे केवळ डोंगरदर्‍यांमधून केलेला प्रवास नव्हता, तर निसर्ग, साहस, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे महत्त्व शिकविणारा अविस्मरणीय जीवनानुभव होता.विद्यालयाच्या वतीने अथर्वचा गौरवपूर्ण सत्कार राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय सहभागाबद्दल श्री बाकलीवाल विद्यालयाच्या वतीने अथर्वचा प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षक किशोर राठोड आणि एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
अथर्वने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, विद्यालयातील शिक्षकवृंद आणि एनसीसीच्या मार्गदर्शकांना दिले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एनसीसी विभागाच्या वतीने त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची भावना रुजविण्याच्या प्रयत्नांना अथर्वच्या या यशामुळे निश्चितच प्रोत्साहन मिळाले आहे.
📲Get App