🔥 TRENDING India U19 Face UAE U19 at Al Amerat in... India Under‑19s Face Pakistan Under‑19... शाहजहांपुर। थाना बंडा क्षेत्र के ग्राम... Dulquer Salmaan’s ‘I’m Game’ Set for O... Trade Expert Weighs Box Office Advanta... Viswak Sen Reviews 'Tupaki': A Fresh T...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

राष्ट्रीय एकता दिनी शहा ग्रामपंचायत व जि. प. शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकता शपथ

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 31 Oct 2026, 03:15 PM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शहा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन देऊन एकता शपथ घेण्यात आली.

शहा ग्रामपंचायत कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता शपथ

शहा, ता. इंदापूर, जि. पुणे |

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून शहा ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शहा येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शाळेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी एकता शपथ घेतली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती सदस्य श्री. विष्णू आबा पाटील, जि.प. प्राथमिक शाळेचे अध्यक्ष श्री. महादेव लांडगे, उपाध्यक्ष श्री. आबासाहेब गंगावणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. शिवाजी शिंदे, सदस्य श्री. दिलीप नागरे, सदस्य श्री. बापू भोई, बागायतदार श्री. बळभीम गंगावणे, बागायतदार श्री. हनुमंत इजगुडे हे उपस्थित होते.

याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई श्री. दशरथ कडवळे, श्री. शरद भोई, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरदार पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
📲Get App