🔥 ट्रेंडिंग नागा छात्र समूह ने नगालैंड में स्वायत्... राज्य के पुलिस थानों में बच्चों की मदद... मुख्यमंत्री ने राज्य में अपराध के खिला... जयपुर में ANTF की कार्रवाई, 100 करोड़... सेवा संकल्प अभियान के तहत विकासखंड स्त... मेघालय के 5.47 लाख ग्रामीण घरों में अब...
03 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

३० रुपयांची ‘कॅम्पा’ कोल्ड्रिंक बॉटल ३५ रुपयांना विकल्याचा प्रकार उघड!

✍️ रिपोर्टर: Janardhan Nitin Jadhav 🗓 02 अक्टू. 2026, 11:40 PM 👁 16
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

प्रवाशांमध्ये तीव्र संताप; कारवाईची मागणी

येवला-मनमाड महामार्गावरील प्रवाशांची हॉटेल चालकांकडून होणारी आर्थिक लूट थांबण्याचे नाव घेत नाहीये. या मार्गावरील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या ‘जय भैरवनाथ राजस्थानी ढाबा’ येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडून छापील किमतीपेक्षा (MRP) अधिक पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिलायन्स कंपनीच्या ३० रुपये छापील किंमत असलेल्या ‘कॅम्पा’ (Campa) कोल्ड्रिंकच्या बॉटलसाठी थेट ३५ रुपये वसूल करून प्रवाशांची सर्रास फसवणूक केली जात आहे.
नेमका प्रकार काय?
हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून शेजारीच रिलायन्स जिओ पेट्रोल पंप असल्याने अनेक वाहने इंधन भरण्यासाठी आणि विश्रांतीसाठी या परिसरात थांबतात. याचाच गैरफायदा घेत पेट्रोल पंपाशेजारील 'जय भैरवनाथ ढाबा' प्रशासनाकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. एका जागृत प्रवाशाने ३० रुपयांची कॅम्पा कोल्ड्रिंकची बॉटल घेतली असता, ढाबा चालकाने ५ रुपये जादा लावून ३५ रुपये वसूल केले. एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेण्यास प्रवाशाने विरोध दर्शवला असता, ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला उद्धटपणे व उडवाउडवीची उत्तरे दिली.
📲Get App