🔥 ट्रेंडिंग Asia second Largest fruit mandi apple... सोनिया गांधी ने अपनी आत्मकथा में कैंसर... सोनी गांधी की पुस्तक पर भाजपा-कांग्रेस... डिंग: दीपावली के बाद कांकेर पुलिस का ज... दिल्ली की हवा में सुधार, 'खराब' श्रेणी... लखनऊ में बच्चे उठाने की आरोप में महिला...
11 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
देश

राजुलवाडीत पिण्याच्या पाण्यात विषारी घटक असल्याचा संशय? तीन दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

✍️ रिपोर्टर: Lankesh Jagdish Pawar 🗓 11 नव. 2026, 07:36 AM 👁 21
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
🔴 BREAKING NEWS | नागपूर जिल्हा

राजुलवाडीत पिण्याच्या पाण्यात विषारी घटक असल्याचा संशय? तीन दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

उमरेड तालुका | राजुलवाडी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील राजुलवाडी गावातून एक अत्यंत गंभीर बाब समोर येत आहे. मागील तीन दिवसांपासून गावात येणाऱ्या पाण्याबाबत ग्रामस्थांकडून गंभीर तक्रारी केल्या जात आहेत. पाण्यात विषारी घटक असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत आहे? पाण्याची तपासणी करण्यात आली आहे का? आणि नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कधी उपलब्ध होणार?

या गंभीर समस्येकडे संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत व ग्रामस्थांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर कार्यवाही करावी!

🎙️ बातमी – राजुलवाडी, उमरेड तालुका, नागपूर जिल्हा.
📲Get App