🔥 TRENDING President Emphasises Community Role in... Yhome Inaugurates New GPS Building at... CRPF Updates SOP for 22,000 Troops Ami... LCMA Shares Conservation and Weed Mana... Manipur Professor Drives Eight-Year En... Meghalaya’s Pineapple Festival Conclud...
18 Jul 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पद्मालय जलसिंचनासाठी 65 कोटी मंजूर

पद्मालय जलसिंचनासाठी 65 कोटी मंजूर

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 18 Jul 2026, 08:13 AM 👁 32

आमदार अमोल पाटील यांनी पद्मालय धरण परिसराची पाहणी करून काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

पद्मालय जलसिंचनासाठी 65 कोटी मंजूर
आमदार अँड अमोल पाटील यांनी पद्मालय धरण परिसराची पाहणी केली काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत मोठी वाढ होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण)-२ (उ. सि. यो.) अंतर्गत सिंचन क्षेत्र १९८२ हेक्टर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामासाठी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे ६५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली होती. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्यापूर्वी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी पद्मालय धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.

याप्रसंगी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, उपअभियंता आरती सुर्यवंशी, कंत्राटदार मनोज शर्मा, कंत्राटदार प्रतिनिधी कुणाल बोरसे, अभियांत्रिकी सहाय्यक अमोल सुर्यवंशी, मा.जि.प.सदस्य भिकाभाऊ कोळी, युवासेना मा.तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळी सरपंच बाळासाहेब पाटील, रिंगणगांव सरपंच आबा मते, गालापूर सरपंच आरिफदादा, खडके बु येथील गोटू पाटील उपस्थित होते.

यावेळी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली, वितरण जाळे, रस्ता क्रॉसिंग, नाला क्रॉसिंग, पाणी वापर संस्था इमारती तसेच इतर अनुषंगिक कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता अबाधित ठेवत येत्या एका वर्षात संपूर्ण काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करून काम वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

या प्रकल्पामुळे १९८२ हेक्टर क्षेत्राला अधिक कार्यक्षम सिंचन सुविधा उपलब्ध होणार असून, पाण्याची मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी थांबण्यास मदत होईल. बंदिस्त नलिका प्रणालीमुळे पाणी थेट शेतापर्यंत पोहोचणार असल्याने बाष्पीभवन व गळती कमी होईल, सिंचनाची कार्यक्षमता वाढेल आणि कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होईल.

याशिवाय शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि सिंचनाचा खर्च कमी होण्याबरोबरच पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. वर्षभर विविध पिके घेण्यास चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. शेती अधिक शाश्वत, आधुनिक आणि जलसंपन्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एरंडोल तालुक्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील असून, पद्मालय धरणाच्या या प्रकल्पामुळे एरंडोल तालुक्यातील कृषी विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
📲Get App