🔥 TRENDING Punjab Development Commission, Vibha,... Indian University Suspends Classes Ami... Assam CM Urges Caution After Nimisha I... Assam CM Himanta Biswa Sarma Pilots Dr... Assam Introduces Four‑Way Waste Segreg... Bihar Board Publishes 2026 DLAAD Resul...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

परवानगी घेऊन वीज बंद, मग सुरू कशी झाली? महावितरणच्या हलगर्जीपणाने घेतला कामगाराचा बळी, नातेवाईकांचा संताप....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 28 Sep 2026, 07:50 PM 👁 11
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - जळगाव विमानतळ रोडवर वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना अंगावर काटा आणणारी दुर्घटना घडली आहे. विद्युत पुरवठा बंद असल्याची खात्री करून खांबावर चढलेल्या महावितरणच्या ३५ वर्षीय कंत्राटी कर्मचारी महेश देविदास अपार यांना अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्याने ते थेट खांबावरून खाली कोसळले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

महेश अपार हे महावितरणमध्ये वीज दुरुस्तीच्या कामावर कार्यरत होते. सोमवारी विमानतळ रोड परिसरात दुरुस्तीसाठी ते विद्युत खांबावर चढले असता हा प्रकार घडला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सहकारी आणि नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील महेश यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने अपार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता.

नातेवाईकांचा गंभीर आरोप - वीज सुरू कशी झाली?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वीज पुरवठा बंद करण्याची रितसर परवानगी घेतल्यानंतरही विद्युत प्रवाह पुन्हा सुरू कसा झाला? असा संतप्त सवाल मृत महेश यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. बंद वीज पुन्हा सुरू झाल्यानेच महेश यांना शॉक लागला असा आरोप करत, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

महावितरणकडून चौकशीचे आश्वासन

दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. चौकशीत कुणाचाही निष्काळजीपणा किंवा चूक आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, तसेच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन महावितरण प्रशासनाने दिले आहे.

या दुर्घटनेमुळे वीज दुरुस्तीच्या वेळी सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? प्रत्यक्षात वीज बंद आहे की नाही याची खात्री केली जाते का? आणि यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस आणि महावितरणच्या चौकशीनंतर या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
📲Get App