🔥 TRENDING અરવલ્લીમાં આશિક અબ્દુલભાઈ મુલતાનીને ઢો... पुलिस ने कोचगांव के दुर्गा ईंट-भट्ठा क... सिकंदराराऊ: सराय उम्दा बेगम स्थित श्री... बेतरतीब टिप्पणी पर प्रश्न: क्या यह अनु... ग्राम पंचायत बलबहरा के दमकी टोला में द... സ്കൂൾ ബസ് അപകടത്തിൽപ്പെട്ടു.
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पुरस्कारानंतरची जबाबदारी पार पडणारे मा.रामदासजी राऊतसर, शिरूर
Entertainment

पुरस्कारानंतरची जबाबदारी पार पडणारे मा.रामदासजी राऊतसर, शिरूर

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 13 Oct 2026, 08:20 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

निर्माता दिग्दर्शक ,लेखक मा.रामदासजी राऊतसर

पुरस्कारानंतरची जबाबदारी पार पडणारे मा.रामदासजी राऊतसर, शिरूर

अनेक वर्षांपासून कलाक्षेत्रात कार्यरत असणारे, निर्माता दिग्दर्शक ,लेखक मा.रामदासजी राऊतसर यांनी तृप्ती प्रोडक्शन शिरूर निर्मित अनेक लघू चित्रपटातून नाविन्यपूर्ण कलाकृती निर्माण करून जुन्या नवीन कलावंतांना प्राधान्य दिलेले आहे. मनोरंजननातून प्रबोधन करून समाजाची कलेची भूक भागवली आहे.अनेक कलावंताचा संच त्यांनी निर्माण केलेला आहे. स्वतःचे जीवन घडवणाऱ्या कुठल्याही नव्या कलावंतांना कलाक्षेत्रात सहज प्रवेश,संधी देण्याचे व्दार त्यांनी उघडून ठेवले आहे. कुटुंबाची तसेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर कलाक्षेत्रामध्ये यांचा ठसा उमटलेला आहे असे डॉक्टर गणेश चंदनशिवे डॉक्टर संपतराव पार्लेकर पापाभाई बोरगावकर मुरली मामा शिंदे बोरगावकर योगेश पाटील सांगलीकर त्याचप्रमाणे नवले सर कोपरगाव काळूरामजी ढोबळे पुणे नाट्यदिग्दर्शक मोहन पानसरे चित्रपट अभिनेते चंद्रकांत भंडारी माननीय निवृत्त फौजदार वसंत पवार मुंबई त्याचप्रमाणे लेखक खंदारे सर नेवासा त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष माननीयमेघराज राजे भोसले पुणे व त्यांचा सर्व संचालक मंडळ अभिनेते राजेंद्र ताम्हाणे अभिनेते सुनील जी गोडबोले सर त्याचप्रमाणे अभिनेते सुभाष दिवटे


मित्रमंडळीची,अभिनेते मा. अमोल गायकवाड शिरूर यांची साथ राऊतसरांना आहे.

या सर्व कामाची दखल घेऊन बेल्हे सांस्कृतिक महोत्सवामध्ये
आदरणीय वसंतराव जगताप व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी संगीतरत्न मा. दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्कार दिल्यानंतर ,आदरणीय रामदासजी राऊतसर निर्माता, दिग्दर्शक,लेखक यांनी जेष्ठ तमाशा कलावंत आहेत, त्यांच्या करीता कामकाज सुरू केलेले आहे.
तमाशा कलावंताना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी मांडणे, त्यांना दिलासा देणे अशाप्रकारे मानवी जाणीवेतून ,शिरूर व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम उभे करणार आहेत. कलेवर आधारित घुंगरू हा चित्रपट निर्माण केलेला आहे.
शिरूर मध्ये येणारे अनेक मान्यवर तृप्ती फिल्म प्रोडक्शनला भेट देत असतात, सर्वांचे आदरतिथ्य ते मनापासून करतात. नुकतीच मा. वसंत अवसरीकर यांनी भेट दिलेली आहे.
तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत दत्तोबा चव्हाण सविंदणेकर यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली व छोट्या खाणी मुलाखत घेऊन त्यांना प्रकाशात आणण्याचे काम राऊत सर यांनी केले

समाज जीवनामध्ये काम करीत असताना तात्विक मतभेद टळत नसतात, सर्वांचेच विचार सर्वांनाच पटतात असेही नसते. पण प्रत्येक माणसांविषयी हृदयाच्या आतील जिव्हाळा , आत्मियता ,ओढ ,स्नेह आणि ऋणानुबंध जपण्याचे कौशल्य मा.राऊतसरांना आहे, याचा अभिमान वाटतो.

नुसता पुरस्कार स्वीकारून आनंद घेण्यापेक्षा त्याच पुरस्काराचे बीज मनात ठेवून, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे, त्यांच्यासाठी काम करण्याचे सामर्थ्य व जबाबदारी आदरणीय राऊतसरांना प्राप्त आहे.
भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा

राजेंद्र.डी.मोरे, बारामती
📲Get App