🔥 TRENDING Rajasthan Board to hold Class 10 exams... Reliance Jio IPO Launches on Dashami,... TVK Govt Saves Rs 187 Cr in 3 Months b... Tamil Nadu By-Polls: Five-Way Contest,... MP Private Hospitals Threaten ABN Boyc... CJP to launch major agitation from Oct...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पारोळा तालुक्यातील 644 पूरग्रस्त कुटुंबांना आमदार अमोल दादा पाटील यांच्या हस्ते शिधाकीटचे वाटप

पारोळा तालुक्यातील 644 पूरग्रस्त कुटुंबांना आमदार अमोल दादा पाटील यांच्या हस्ते शिधाकीटचे वाटप

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 13 Aug 2026, 05:08 PM 👁 113
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मदत

संकटग्रस्त ६४४ कुटुंबांना शासनाची मदत; आमदार अमोलदादांच्या पाठपुराव्याला यश!

दि. ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरे जमीनदोस्त झाली, तर संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करताना आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आमदार अमोलदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून, आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत मा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचा वापर करून पारोळा तालुक्यातील ६४४ पूरग्रस्त कुटुंबांना शासनाच्या वतीने शिधा किट उपलब्ध करून देण्यात आले.

या शिधा किटचे वाटप आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नायब तहसिलदार अनिल पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, विवेकभाऊ पाटील यांचेसह आदी मान्यवर, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी कुटुंबे उपस्थित होते.

अतिवृष्टीच्या संकटात नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी पाहणीपासून ते शासनस्तरावर मदत उपलब्ध होईपर्यंत आमदार अमोलदादांनी सातत्याने पाठपुरावा केला. जनतेच्या अडचणीच्या काळात प्रशासन आणि शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ही संवेदनशील आणि तत्पर भूमिका ठरली आहे.

नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत…
शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा!
📲Get App