🔥 TRENDING નર્મદામાં પલ્સ પોલિયો અભિયાનનો પ્રારંભ... Anandraj Ambedkar Issues Statement on... UP Deputy CMs Criticise SP Chief Akhil... ਡਿਬਰੂਗੜ੍ਹ ਜੇਲ੍ਹ ਪਹੁੰਚੇ MP ਅੰਮ੍ਰਿਤਪਾਲ ਸ... Delhi-NCR to Cut Air Pollution by 20%... BJP Faces Data Dilemma Ahead of 2024 G...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पारगाव आरोग्य उपकेंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त सुरुवात...!

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 22 Nov 2026, 01:38 PM 👁 34
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ.. सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

पारगाव (शिंगवे) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील आरोग्य उपकेंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

देशातील प्रत्येक बालक पोलिओमुक्त आणि सुरक्षित राहावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक धोरणानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. गावातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे डोस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी वैद्यकीय कर्मचारी डॉ. शहाणे, आरोग्य सेविका ज्योती दातखिळे, वर्षा लबडे, नंदा खामकर तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय निश्चितपणे!' या संदेशातून बालकांच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
📲Get App