🔥 TRENDING Two motorbikes collide head‑on in Muza... Paramount Releases Trailer for K-Pop D... Bisleri assures safety of water from a... Mahakaleshwar Temple Adorned with Gane... Cillian Murphy and Jessie Buckley Join... नूंह के लहरवाड़ी में महिला हत्याकांड म...
25 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा काकडा मंडळचा चंद्रभागेच्या तिरी वरती काकडा समाप्ती.

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 25 Nov 2026, 07:29 AM 👁 50
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा काकडा मंडळचा चंद्रभागेच्या तीरी काकडा समाप्ती.

पिंपरी पेंढार मधील दुरगुडे पट नं.1 येथील श्री चारंगबाबा काकडा मंडळचा काकडा समाप्ती चंद्रभागेच्या तीरावर समाप्ती झाली. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा या संपूर्ण महिन्याच्या कालावधीत श्री चारंगबाबा मंदिर या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने ग्रामस्थ तसेच माता-भगिनी काकड साठी येत होत्या अनेक अन्नदात्यांनी प्रसाद काकडा मंडळासाठी ठेवला होता तुळशी विवाह नंतर पौर्णिमेनंतर काकड्याची समाप्ती होत असते आणि ही समाप्ती पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरती दरवर्षी काकडा मंडळ येऊन करत असतात त्यामुळे सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामस्थ या काकडा साठी चंद्रभागातिरावर्ती जमले होते पौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरमध्ये येऊन विठुरायाचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी ठीक पहाटे चार वाजता काकडे ला सुरुवात झाली काकड आरती झाली अभंग आंधळा पांगळा गवळणी अशा मालिका घेत काकड आरती करत या काकड्याची सांगता झाली त्या निमित्ताने पिंपरी पेंढार मधील गायमुख वाडी तसेच पिंपरी पेंढारगावातील अनेक काकडा मंडळ उपस्थित होते गेले दोन-तीन दिवस चंद्रभागे तीरावरती लोक बहुसंख्येने उपस्थित होतात आणि काकडा सांगता करत असतात त्या निमित्ताने चारंगबाबा मंडळातील श्री लक्ष्मण दुरगुडे . श्री दत्ता दुरगुडे .श्री विलास दुरगुडे.श्री नामदेव दुरगुडे. श्री शरद कुटे श्री काशिनाथ दुरगुडे श्री अशोक दुरगुडे.कु अनुज दुरगुडे महिलांमध्ये सौ सुरेखा दुरगुडे .सौ अनिता दुरगुडे. सौ शौला दुरगुडे.सौ सावित्रीबाई विधाटे अशा अनेक माता भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते यानंतर प्रसाद तयार करण्यात आला तो चंद्रभागेला तसेच पांडुरंगाला दाखवण्यात आला आणि पुढच्या प्रवासासाठी आपल्या काकडा मंडळ पुन्हा परतीच्या प्रवासाकडे निघाले भक्तिमय वातावरणात गेले महिनाभर व पंढरपूर मध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये काकड्याची समाप्ती झाली पंढरीनाथ पांडुरंग सर्व लोकांचे कल्याण करू व सर्वांवर चांगली कृपादृष्टी ठेव ही परमेश्वरचरित प्रार्थना राम कृष्ण हरी.
📲Get App