🔥 TRENDING નાંદરવા ગામે ગાંધી જયંતીએ સ્વચ્છ ભારત... સુરતને મળી પહેલી વંદે ભારત ટ્રેનની ભેટ... South Goa District Hospital Considers... Three Arrested in Thane Shiv Sena Lead... CRPF’s 133rd Battalion Hosts 10‑km Mar... जामा मस्जिद क्षेत्र में 24 घंटे खुली र...
02 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच 
दिवशी पेन्शन जमा; ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम
Jobs & Career

पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा; ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 02 Oct 2026, 07:12 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा; ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम

Need 24News
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २/१०/२०२६
ठाणे

महिन्याची सुरुवात होताच पेन्शन खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुरुवारी मिळाला दिलासा.
महिन्याची सुरुवात होताच पेन्शन खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ठाणे जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या वेळबद्ध पेन्शन वितरण प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील २ हजार २५० पेन्शनधारकांच्या खात्यावर १ ऑक्टोबरलाच पेन्शन जमा करण्यात आली. राज्यातील ठाणे, सातारा आणि नागपूर जिल्ह्यांत हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात राबविला जात आहे.पेन्शन वितरणाची प्रक्रिया महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण करण्यासाठी वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाने आवश्यक माहिती संकलनापासून ते पडताळणी आणि आर्थिक व्यवहारापर्यंतची कामे पूर्वनियोजित पद्धतीने पूर्ण केली. डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध स्तरांवरील माहितीची देवाणघेवाण आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पार पाडण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी या प्रक्रियेचे नियोजन केले. मुख्यालय तसेच सहा तालुक्यांतील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यामुळे एकाच दिवशी सर्व पेन्शनधारकांना पेन्शन देणे शक्य झाले.
सहा तालुक्यांतील लाभार्थी
ठाणे जिल्हा परिषद मुख्यालयातील ४२४, मुरबाडमधील ३४४, शहापूरमधील ४४९, भिवंडीतील २६१, कल्याणमधील ४८० आणि अंबरनाथमधील २९२ अशा एकूण २,२५० पेन्शनधारकांच्या खात्यावर पेन्शन जमा करण्यात आली.

आर्थिक नियोजनासाठी सुविधा

महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन मिळाल्याने निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरखर्च, औषधोपचार, विविध देयके आणि अन्य आर्थिक बाबींचे नियोजन वेळेत करता येणार आहे. पेन्शन वितरणातील विलंब टाळण्यासाठी माहितीची पडताळणी आणि आर्थिक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जिल्हा परिषद मुख्यालयातील वित्त व सामान्य प्रशासन विभागासोबतच तालुकास्तरावरील विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत कार्यवाही पूर्ण केली. डिजिटल प्रणालीचा वापर करून वेळेची बचत, विभागांमधील समन्वय आणि वेळबद्ध सेवा यावर भर देण्यात आला.
📲Get App