🔥 ट्रेंडिंग भोपाल मास्टर प्लान-2047 पर कांग्रेस ने... बिहार को औद्योगिक विकास और निवेश के क्... इंदौर में 800 बस्तियों में निकला RSS क... बीना स्टेशन में बदलाव से चार मेमू ट्रे... पटना में बिहार गौरव सम्मान समारोह, कृष... छत्रपती संभाजीनगर में 23 बिल्डरों पर अ...
25 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पाणीटंचाईचे संकट गडद; कुकडी, डिंभे, चासकमानमधून आवर्तन सोडण्याची मागणी..!!

✍️ रिपोर्टर: Surendra Uttam Sonawane 🗓 25 अक्टू. 2026, 03:14 PM 👁 44
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आ. दिलीप वळसे-पाटील यांचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी..! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

(लोणी, ता. आंबेगाव) : पावसाने पाठ फिरवल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिके वाचविण्यासाठी आता धरणांच्या पाण्यावर आशा लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी, डिंभे आणि चासकमान धरणांतून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली...!

जुलै २०२६ नंतर पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके सुकण्याची भीती निर्माण झाली असून, उत्पादन घटण्याच्या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.

आवर्तनासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा..!

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांना पत्र देत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि पाणीटंचाईच्या संकटातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी संबंधित प्रकल्पांतून तातडीने आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे...!

सध्या पाण्याची गरज वाढली असताना आवर्तनाबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा आणि सिंचनाचे नियोजन लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

कुकडी, डिंभे आणि चासकमान प्रकल्पांतून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभाग काय निर्णय घेतो, याकडे आंबेगाव तालुक्यासह संबंधित लाभक्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
📲Get App