🔥 TRENDING वारिसलीगंज में पुराने विवाद पर ताबड़तो... Stock Market Stalls as Indian Blockbus... Bay of Bengal Low Pressure Area Poised... Ramayana Tops Box Office in Tamil Nadu... New Cyclone Forms, Tamil Nadu Expected... Madhya Pradesh to Open 22 New Medical...
14 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 14 Nov 2026, 10:20 AM 👁 21
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पोलीस जनता चषक क्रिकेट स्पर्धेचे मंद्रूप येथे उद्घाटन
संचार वृत्तसेवा
🔺 मंद्रूप, दि. १३-
मंद्रूप पोलीस ठाण्याच्यावतीने आणि लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या 'पोलीस जनता चषक' क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस नागरिक पत्रकार यांच्यात सुसंवाद राहावा संवादातून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी तसेच या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मंद्रूपचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, पोलीस उपअधीक्षक सूरज जगताप तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे-पाटील आदी उपस्थित होते.
कै. महादेव म्हेत्रे मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ८ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
पोलीस आणि नागरिक यांच्यात समन्वय राहील
पोलीस जनता चषक स्पर्धेमुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना आणि आदर निर्माण होईल या खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहणार आहे. युवकांना या स्पर्धेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे. मंद्रूपचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काढले.
पोलीस-नागरिकांसाठी स्पर्धेचे आयोजन
पोलीस बांधव सततच्या बंदोबस्त आणि कामाच्या ताणामुळे त्यांचे मानसिक शारीरिक थकवा जाणवतो. त्यांच्यात चैतन्य निर्माण होऊन त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोलिसांना या मैदानात उतरवले आहे तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत.
गणेश शिंदे
उपविभागीय पोलीस अधिकारी, मंद्रूप
📲Get App