🔥 TRENDING Pigeon with ‘BAN’ tag seized in Odisha... Odisha Weather Update: Current Conditi... Canada Deports Logistics Manager of La... Two Youths Shot Near Police Station in... CBI officer posted in RG Kar assigned... Teacher Dies After Karela Highway Cras...
16 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पहूर-जामनेर मार्गावर काळाचा घाला : ४०७ चा टायर फुटला, दोन निष्पाप हमाल जागीच ठार...!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 16 Sep 2026, 10:02 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पहूर-जामनेर मार्गावर काळाचा घाला : ४०७ चा टायर फुटला, दोन निष्पाप हमाल जागीच ठार...!

पोषण आहाराच्या वाहनांची तपासणी करणार कोण?

फिटनेस आहे का, ओव्हरलोड तपासतो कोण? दोन बळींनंतर यंत्रणेचा बोजवारा उघड

जामनेर : पहूरजवळील गोंदेगावच्या ऋषीबाबा मंदिर परिसरात मंगळवारी (दि. १५) सकाळी पोषण आहाराचे धान्य वाहून नेणाऱ्या एमएच-१४ एफ-३५०४ या ४०७ वाहनाचा मागील टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पाचोऱ्यातील दोन हमाल जागीच ठार झाले. या घटनेने शासकीय धान्य वाहतुकीतील गंभीर अनियमिततेवर प्रकाश टाकला आहे.

या अपघातात जगदीश लालचंद पाटील (४१, कृष्णापुरी) व अर्जुन तुकाराम पाटील (५२, बहिरमनगर, दोघे रा. पाचोरा) या दोन निष्पाप हमालांचा धान्याच्या गोण्यांवर बसलेले असतानाच फेकले जाऊन मृत्यू झाला. पहूर पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले.

या घटनेने उपस्थित झालेले गंभीर प्रश्न :

१) या वाहनांमध्ये माल त्यांच्या वाहतूक क्षमते एवढाच होता का, की क्षमतेपेक्षा जास्त माल कोंबून भरला होता? आणि याची तपासणी करणारी यंत्रणा तरी कोण आहे?

२) ओव्हरलोड माल भरल्यामुळेच टायरवर अतिरिक्त ताण येऊन टायरचा स्फोट झाला का? याची तांत्रिक तपासणी होणार का?

३) अशा शासकीय योजनेचे धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाचे (RTO) वैध फिटनेस प्रमाणपत्र आहे का? नसेल तर त्यांना ठेका कोणी दिला?

नियमानुसार मालवाहू वाहनात माणसांची वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा असताना, हमालांना गोण्यांवर बसवून वाहतूक करण्याची जीवघेणी प्रथा सर्रास सुरू आहे. या बेकायदा वाहतुकीकडे पुरवठा विभाग आणि आरटीओचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का? या दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूस जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांमधून उपस्थित होत असून, या प्रकरणी वाहन मालक, ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन सखोल चौकशी होणार का.... अशी चर्चा जोर धरू लागली आहे
📲Get App