🔥 TRENDING AAP releases first candidate list for... Unseasonal Rain Alert Issued for Madhy... Bombay High Court Declares Arun Farera... अंतर्राष्ट्रीय वैश्य महासम्मेलन (महिला... जयपुर में पति ने रॉड से पत्नी की हत्या... उज्जैन की नाबालिग बालिका के अपहरण में...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

औजमध्ये भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 31 Oct 2026, 06:53 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
औजमध्ये भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त!


मंद्रूप पोलिसांची कारवाई; जेसीबीसह दोन ट्रॅक्टर आणि वाळू जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

औज : प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज-मंद्रूप गावालगत असलेल्या भीमा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा केल्याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी कारवाई करत जेसीबी, दोन ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण १९ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अयाज जाफरसो पाटील (वय ४५, रा. औज-मंद्रूप) याच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ ते ६.५० वाजण्याच्या दरम्यान औज-मंद्रूप गावालगत भीमा नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. वाळू ही शासकीय मालमत्ता असून, विनापरवाना उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची जाणीव असतानाही संबंधितांनी वाळू उपसा केल्याचा आरोप आहे.

या कारवाईत ९ लाख रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा विनाक्रमांक जेसीबी, ६ हजार रुपये किमतीची वाळू, ५ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर आणि ५ लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा सोनालिका ट्रॅक्टर (क्र. एमएच १३ डीएम ३१०८) असा एकूण १९ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी किरण दशरथ कोठुळे (वय ३२, नेमणूक औज-मंद्रूप) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस हवालदार बिराजदार करीत आहेत.
📲Get App