🔥 ट्रेंडिंग ಜನವರಿ-ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಸತಿ ಮಾರಾಟದ... காரைக்குடி மாநகராட்சியில்  தீபாவளி சிற... କଲେଜ କ୍ୟାମ୍ପସରୁ ପଞ୍ଚାୟତ ଯାଏଁ ବିଜେପିର ବ... જૂનાગઢ GIDC-2 માં પ્લાસ્ટિક કારખાનામાં... दीपावली पर कुम्हारों को बड़ी राहत, मिट... ಕರ್ನಾಟಕದ ಯುವ ಚೆಸ್ ಆಟಗಾರ ಅಂತರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗ...
06 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

Need Zee24

✍️ रिपोर्टर: Kantilal Shivram Kasabale 🗓 06 नव. 2026, 02:00 PM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
रायगड टॉप न्यूज
तळा प्रतिनिधी

रेशनच्या धान्यात आळ्या, गुठे अन् साखरेत मुंगळे!

महागाव परिसरात निकृष्ट धान्याचे वाटप

गरिबांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी दिले जाणारे धान्यच खाण्यायोग्य नसेल, तर या योजनेचा उपयोग काय? ग्रामस्थांचा संतप्त सवाल.

तळा तालुक्यातील महागाव परिसरात वितरित करण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्यात मोठ्या प्रमाणावर आळ्या आढळून आल्या असून, धान्याचे मोठमोठे गुठे तयार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर साखरेमध्येही मोठ्या प्रमाणावर मुंगळे असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.

शासनाकडून गोरगरीब नागरिकांना उदरनिर्वाहासाठी दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनच्या धान्याच्या दर्जाबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गरीब व गरजू नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

हे धान्य खाण्यासाठी दिले आहे की मारण्यासाठी?

महागाव गावातील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जयवंत सिताराम जाधव यांनी आपली व्यथा मांडताना प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "हे धान्य नक्की खाण्यासाठी दिले आहे की मारण्यासाठी? धान्य व्यवस्थित नसेल, तर ते देऊन उपयोग काय? अशा धान्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते."

दुकानदारांची भूमिका काय?

या संदर्भात दुकानदारांची भूमिका विचारली असता, शासनाकडून जसे धान्य प्राप्त होते, तसेच आपण वितरित करत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याची चौकशी करणे गरजेचे आहे.

तपासणीची गरज

धान्याच्या साठवणुकीत, पुरवठा व्यवस्थेत किंवा वितरण प्रक्रियेत दोष आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

पालकमंत्री, आमदार-मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणार का?

या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सर्व रेशन दुकानदारांवर नियंत्रण ठेवून गरजू नागरिकांना चांगल्या प्रतीचे धान्य मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शासन गरीबांच्या आरोग्याशी तडजोड करण्यासाठी नव्हे!

पत्रकार : श्री कांतीलाल शिवराम कसबले
तळा प्रतिनिधी
📲Get App